पाकिस्तानकडून मदतीचा हात व्हेंटिलेटरसह वैद्यकीय उपकरणे पाठवण्यास तयार


Beed Reporter News Paper Today

भारतात वाढत असलेल्या करोनाबाधितांच्या संख्येने जगात चिंता व्यक्त केली जात आहे. अनेक देशांनी भारताला मदतीचा हात दिल्यानंतर आता पाकिस्तानही मदतीसाठी पुढे सरसावला आहे. व्हेंटिलेटरसह इतर आवश्यक उपकरणे पाठवण्याची तयारी केली आहे. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने याबाबतची माहिती दिली आहे. दोन दिवसांपूर्वीच पाकिस्तानमध्ये भारताच्या मदतीसाठी सोशल मीडियावर मोहीम सुरू झाली होती.

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, करोनाविरुद्धच्या लढाईत आम्ही भारतीयांसोबत एकजूटता व्यक्त करत आहोत. भारतासाठी आम्ही आवश्यक वैद्यकीय उपकरणे, पीपीई किट्स, व्हेंटेलेटर पाठवण्यास तयार असल्याचे पाकिस्तान सरकारने म्हटले. जागतिक महासाथीच्या संकटावर मात करण्यासाठी परस्पर सहकार्य करण्याचा सर्व प्रयत्न दोन्ही देश करू शकतात, असेही परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले.

'आणखी ढोंग नाही करू शकत' आमिर खानच्या मुलीला केलं ट्रोल

याआधी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारतीयांसोबत भ्रातृभाव व्यक्त केला होता. मानवतेसमोर आलेल्या या जागतिक संकटाचा मुकाबला एकत्रितपणे करायला हवा. भारतासह जगातील इतर देशही या संकटातून लवकर बाहेर पडतील अशी प्रार्थना करत असल्याचे खान यांनी म्हटले होते.

पाकिस्तानमध्ये ही करोनाचे संकट

पाकिस्तानमध्ये ही करोनाचे संकट वाढत असल्याचे चित्र आहे. शनिवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, पाकिस्तानमध्ये शुक्रवारी १५७ जणांच्या मृत्यूंची नोंद करण्यात आली. ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. मागील वर्षी एकाच दिवसांत १५३ करोनाबाधितांचा मृ्त्यू झाला होता.

बीड जिल्ह्यातील गावानेच सुरू केले कोव्हिड सेंटर

पाकिस्तानमध्ये करोना संसर्गाला नियंत्रित करण्यासाठी सरकारने कठोर पावले उचलण्याच्या दृष्टीने निर्णय घेतले आहेत. कोविडबाबतचे नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी लष्कराची मदत घेण्याची शिफारस पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केली आहे.