धस यांचा दणका;टाळेबंदीतून सूट देण्याचे प्रशासनाचे लेखी आश्वासन
बीड : जिल्ह्यात २६ मार्च च्या मध्यरात्रीपासून लॉकडाऊन लागू करण्यात आलंय मात्र या लॉकडाऊनला व्यापारी वर्गाचा विरोध आहे. भाजपा आमदार सुरेश धस यांनी देखील या लॉकडाऊचा कडाडून विरोध केला आहे.
आज आष्टी प्रशासनाच्या कार्यालयात आ.धस यांनी ठिय्या मांडला होता तर व्यापाऱ्यांनी दुकाने सुरु ठेवावेत असे आवाहन देखीव त्यांनी केले होते. पुढील तीन दिवसाचे कडक लाँकडाऊन करा दहा दिवसाचे लॉकडाऊन व्यापारी वर्गाला मान्य नाही ते शिथिल करा यासंदर्भात आ.सुरेश धस मागणी केली होती.
शेवटी प्रशासनाला नारमाई घ्यावी लागली आहे येणाऱ्या तीन दिवसात कडकडीत लॉक डाऊन असेल आणि नंतर बाजार पेठेत सूट मिळणार आहे असे आश्वासन आ. सुरेश धस यांना प्रशासनाने दिले आहे. पुढील तीन दिवस कडक लॉक डाऊन असेल आणि पुन्हा परिस्थिती पाहून शिथिलता आणता येईल असे आश्वासन धस यांना उपविभागीय अधिकारी यांनी लेखी पत्राद्वारे दिले आहे.
दरम्यान ज्या व्यापाऱ्यांना आपण दुकाने उघडण्यास संगीतले आहे त्यांना सध्या लागू केलेले नियम ओळण्यास आदेशीत करावे असेही उपविभागीय अधिकारी यांनी लेखी पत्रात म्हंटलंय. त्यामुळे व्यापारी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे.
टिप्पणी पोस्ट करा