बीड बायपास रस्ता रूंदीकरण मोहीम जोरात

 


 

महापालिकेने रस्ता रुंदीकरणासाठी हाती घेतलेली बीड बायपास रोडवरील कारवाई अजूनही सुरूच आहे. शुक्रवारी दिवसभरात पालिकेच्या अतिक्रमण विभागाने आणखी दोन मालमत्तांवर बुलडोझर चढवत त्या पाडण्यात आल्या. बीड बायपास हा वाढत्या अपघातामुळे मृत्यूचा सापळा बनलेला आहे.

Beed News

सर्व्हीस रोडच्या मागणीसाठी नागरिक आक्रमक होताच महापालिकेने दोन वर्षांपूर्वी मोठ्या पोलिस बंदोबस्तात बीड बायपासवर पाडापाडी सुरू केली. मात्र, काही मालमत्ताधारकांनी महापालिकेच्या मोहिमेला विरोध करत न्यायालयात धाव घेतली होती.

Beed Batamy

पालिका प्रशासनाने दोन वर्षांपूर्वी बीड बायपास सर्व्हीस रोडसाठी बाधित मालतमत्तांची पाडापाडीची मोहीम राबवली. मात्र २३ मालमत्ताधारकांनी याविरोधात न्यायालयात धाव घेतल्याने पुढील कारवाई रखडली होती. अखेर न्यायालयाचा निकाल आल्यानंतर मागील आठवड्यात मार्किंग करून कारवाई सुरू केली.

आतापर्यंत १८ मालमत्ता पाडून रस्ता मोकळा केला आहे. शुक्रवारी वाजेद खान शब्बीर खान यांच्यासह अन्य एक इमारत जेसीबीच्या माध्यमातून पाडण्यात आली. अतिक्रमण विभागाच्या पथकाने ही कारवाई केली. ही कारवाई पदनिर्देशित अधिकारी सविता सोनवणे, आर.एस. राचतवार, वसंत भोये, इमारत निरीक्षक सय्यद जमशीद, मजहर अली यांच्या पथकाने केली.