आम्ही बीड जिल्हा समाज कल्याण विभागमार्फत 'दिव्यांगसाथी' वेबसाइट सुरू केलेली आहे



बीड जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बांधवांना आवाहन करण्यात येते की दिव्यांगत्वाच्या प्रकारानुसार जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींची आकडेवारी सामाजिक न्याय विभागाकडे असायला हवी, जेणेकरून विभागाची कोणतीही योजना एका क्लिकवर उपलब्ध करून देता येईल; या संकल्पनेतून

आम्ही बीड जिल्हा समाज कल्याण विभागमार्फत 'दिव्यांगसाथी' www.divyangsathizpbeed.com नावाची वेबसाइट सुरू केलेली आहे. या वेबसाईटवर जिल्ह्यातील प्रत्येक दिव्यांग व्यक्तीची दिव्यांगत्वाच्या प्रकारानुसार नोंदणी करणे सुरू आहे. 

ग्रामीण भागातील दिव्यांग व्यक्तींची नोंदणी अंगणवाडी सेविकांमार्फत करण्यात येत आहे. तर नगरपालिका क्षेत्रातील दिव्यांग व्यक्तींची नोंदणी दिव्यांग शाळेतील शिक्षकांच्या मार्फत होत आहे. याव्यतिरिक्त तालुक्यातील प्रत्येक दिव्यांग शाळेत देखील नाव नोंदणी करणे सुरू आहे. बीड शहरातील दिव्यांग व्यक्ती समाज कल्याण कार्यालयात सकाळी 10 ते 5 या वेळेदरम्यान येऊन नोंदणी करू शकतात. 

येत्या काळात राज्य शासनाच्या सर्व योजना या वेबसाईटच्या माध्यमातून एका क्लिकवर उपलब्ध करण्यात येणार आहेत. यापुढे दिव्यांग व्यक्तींना प्रत्येक वेळी फार्म भरायची गरज पडणार नाही. त्याकरिता सर्व दिव्यांग बांधवांची नोंदणी होणे आवश्यक आहे.

दिव्यांग कल्याण क्षेत्रात काम करणाऱ्या विविध सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्ते आदींना देखील आवाहन करण्यात येते की, जिल्ह्यातील सर्व दिव्यांग व्यक्ती/विद्यार्थी यांची या वेबसाईटवर नोंद होईल, यासाठी सहकार्य करावे. 

बीड जिल्ह्यातील सर्व दिव्यांग बांधवांना आवाहन करण्यात येते की दिव्यांगत्वाच्या प्रकारानुसार जिल्ह्यातील दिव्यांग...

Posted by Dhananjay Munde on Wednesday, 3 March 2021