प्लॉटच्या वादातून दोन महिलांना मारहाण | Beed News | Latest Beed News in Marathi



बीड  - शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील महात्मा फुले नगर येथील रहिवासी असलेल्या दोन महिलांना काल सायंकाळी साडेपाच सहाच्या दरम्यान तिघा जणांनी गंभीर मारहाण करत जखमी केले. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल झाला आहे. ही मारहाण प्लॉटच्या वादातून झाली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

   शाहूनगर येथील रहिवासी मोनाली पुजारी व सोनी कम्मानूर यांना काल सायंकाळी मारुती साळवे, शाम साळवे व शरद साळवे यांनी मारहाण केली. या प्रकरणीशिवाजीनगर पोलिस ठाण्यात कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल झाला असून दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, महात्मा फुले नगरमध्ये आमच्या घराच्या शेजारी आमच्याच मालकीचा प्लॉट असूनतो मारुती साळवे, शाम साळवे व शरद साळवे हे बळकावण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्हाला वारंवार धमक्या देत असून काल त्यांनी मारहाण केली, असे म्हटले. या प्रकरणाचा शिवाजीनगर पोलिस तपास घेत असून घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक संतोष वाळके, शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे पीआय सुनिल बिर्ला, पीएसआय गोडसे यांनी घटनास्थळी भेट दिली.