ट्विटरने ब्लॉक केले डोनाल्ड ट्रम्प यांचे अकाऊंट

💥 अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरने जोरादार झटका दिला आहे. 


📵 ट्रम्प यांच्या प्रचाराचे ट्विटर अकाऊंट 'टीम ट्रम्प' अस्थायी स्वरुपासाठी ब्लॉक करण्यात आले आहे. 


💁‍♂️ अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत प्रतिस्पर्धी उमेदवार जो बायडन यांच्या मुलाची वैयक्तिक माहिती ट्विट करण्यात आल्यानंतर ट्रम्प यांच्या प्रचाराचे अकाऊंट ट्विटरने ब्लॉक केले.


🗣️ ट्रम्प यांच्या प्रचाराचे ट्विटर अकाऊंट ब्लॉक केल्यानंतर ट्विटरवर अनेकांनी टीका केली आहे. 


📍 एखाद्या व्यक्तीची वैयक्तिक माहिती सार्वजनिक करणे ट्विटरच्या नियमांविरोधात आहे. 


📜 ट्रम्प यांना ब्लॉक करण्यात आलेल्या अकाऊंटवर जर पोस्ट करायच्या असतील तर तो व्हिडीओ डिलीट करावा लागेल, अशी माहिती ट्विटरकडून देण्यात आली.