...म्हणून उपवासात हात पाय थरथरतात!
🤓 ...म्हणून उपवासात हात पाय थरथरतात!
उपवास करण्यामागे श्रद्धेचा भाग असतो. मात्र उपवासात उद्भवणाऱ्या समस्या ह्या कधीकधी उपवासामुळे नसतात, तर त्यामागे काही वैद्यकीय कारणे असण्याची शक्यता असू शकते. आज आपण यापैकी काही कारणे जाणून घेणार आहोत:
● पित्त: काही लोक काहीही न खाता उपवास करतात. त्यांच्या नियमित जीवनशैलीपेक्षा हे शरीरासाठी नवीन असतं. त्यामुळे पित्त होऊन उलट्या झाल्या, तरी देखील ब्लड प्रेशर वाढून हातपाय थरथरतात.
● झोपेचा आजार किंवा समस्या: झोपेसंबंधी काही समस्या किंवा आजार असल्यास देखील रात्री झोप पूर्ण होत नाही आणि त्यात उपवास करत असाल तर ऍसिडिटी वाढते. यामुळे हातपाय थरथरतात.
● स्ट्रोक: रक्तस्राव झाला तर रक्तपुरवठा मेंदूपर्यंत योग्य प्रमाणात होत नाही आणि शरीरावरचं संतुलन बिघडतं. यामुळे देखील हातपाय थरथरतात.
त्यामुळे उपवास करत असाल आणि अशी समस्या जाणवली तर उपवासाची कारणे देऊन, शरीराकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. त्वरित तज्ज्ञांचा सल्ला घेणे योग्य ठरेल.
Disclaimer : आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जबाबदारी ILOVEBEED घेत नाही.
टिप्पणी पोस्ट करा