SBI या कामासाठी देणार महिन्याला एक लाख; लवकर करा अर्ज आता उरले फक्त 5 दिवस

 

स्‍टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) पोस्ट डॉक्टोरल रिसर्च फेलोशिपसाठी  (Post Doctoral Research Fellowship) अर्ज मागवले आहेत.  एसबीआयमार्फत निवडण्यात आलेल्यांना प्रत्येक महिन्याला एक लाख रुपये दिले जाणार आहे. फेलोशिप संपल्यानंतर परफॉर्मन्स तपासला जाईल आणि त्या आधारावर त्यांना 2 ते 5 लाख रुपये एकाच वेळी दिले जातील.

या फेलोशिप प्रोग्रामसाठी 18 सप्टेंबरपासून ऑनलाइन रजिस्ट्रेशन सुरू झालं होतं. 8 ऑक्टोबरपर्यंतच हे रजिस्ट्रेशन असेल. म्हणजे आता तुमच्याकडे फक्त पाच दिवस शिल्लक आहेत.

या फेलोशिपसाठी दोन वर्षांचा कॉन्ट्रॅक्ट पीरिअड म्हणजे करार असेल. यासाठी फक्त 5 जागा आहेत. शॉर्टलिस्टींग आणि मुलाखतीमार्फत निवड केली जाणार आहे. आवेदन करणाऱ्यांना मुलाखतीसाठी ई-मेलमार्फत लेटर पाठवलं जाईल. याशिवाय यासंबंधी माहिती एसबीआयच्या वेबसाईटवरही उपलब्ध केली जाईल. एसबीआयच्या मते, निवडलेल्या अर्जदारांसाठी कोलकातातील स्टेर बँक ऑफ इन्स्टिट्युट ऑफ लीडरशीपमध्ये पाठवलं जाऊ शकतं.


फेलोशिपसाठी पात्रता

या फेलोशिपसाठी अप्लाय करण्यासाठी तुमचं वय 31 जुलै 2020 ला 40 पेक्षा जास्त नसावं.

बँकिंग, फायनान्स, आयटी किंवा इकोनॉमिक्ससंबंधी विषयात पीएचडी असायला हवी.

अर्जदाराचं अकॅडमिक रेकॉर्ड चांगला असालया हवा.

हे वाचा - कोरोनामध्ये सर्वसामान्यांचे हाल, पोस्टाची कमाई पाहून तुम्ही व्हाल हैराण...

ए कॅटेगिरी जर्नलमध्ये, एखाद्या पेपर किंवा आर्टिकलमध्ये लेखक किंवा सहलेखक म्हणून योगदान दिलं असेल तर त्याला प्राधान्य दिलं जाईल.

पीएचडीनंतर IIM, IIT, ISB, XLRI यासारख्या इन्स्टिट्युट किंवा कन्सल्टेंसीमध्ये शिकवण्याचा किंवा रिसर्चचा कमीत कमी तीन वर्ष अनुभव असायला हवा.

कसं कराल अप्लाय

https://bank.sbi/careers किंवा https://www.sbi.co.in/careers  या वेबसाईटवर जाऊन नोंदणी करावी.

आपला फोटो, सही स्कॅन करून अपलोड करावेल लागतील.

बर्थ सर्टिफिकेट, एज्युकेशनल सर्टिफिकेट, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट, आयडी प्रुफसारख्या डॉक्युमेंट्सची कॉपी ऑनलाइन सबमिट करावी लागेल.

हे वाचा - कर्जदारांना मोदी सरकारने दिला मोठा दिलासा, व्याजाबाबत दिली महत्त्वाची माहिती

मुलाखतीसाठी निवड झाल्यास ओरिजनल डॉक्युमेंट्स सोबत न्यावे लागतील.

अॅप्लिकेशन प्रिंटआउटसह सर्व आवश्यक डॉक्युमेंट्सची सेल्फ अटेस्टेड कॉपी एसबीआयच्या मुंबई कॉर्पोरेट ऑफिसमध्ये पाठवावी लागेल.



आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!