💥 युद्धासाठी तयार रहा; चीनच्या राष्ट्राध्यक्षांचे आदेश

युद्धासाठी तयार रहा; चीनच्या राष्ट्राध्यक्षांचे आदेश


💫 भारत-चीन तणावजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पीपल्स लिबरेशन आर्मीच्या सैनिकांना युद्धासाठी सज्ज रहाण्याचे आदेश चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी दिले आहेत.

✨ देशाशी पूर्णपणे निष्ठावान रहा, असे जिनपिंग यांनी म्हटले असून त्यांनी गुआंगडोंग या चीनच्या लष्करी तळाला भेट दिली. 

📍 यावेळी त्यांनी प्रचंड सर्तक रहा आणि युद्धाच्या तयारीवर ऊर्जा केंद्रीत करा, असे आपल्या सैन्याला आवाहन केले. 

📌 दरम्यान, नेमके कोणत्या देशाबद्दल जिनपिंग यांनी हे वक्तव्य केले, ते अजून स्पष्ट झालेले नाही.