शनिवारी धनंजय मुंडेंच्या हस्ते प्रधानमंत्री आवास योजनेतील १२५ लाभार्थींना होणार धनादेशाचे वाटप

 




💁‍♂️ शनिवारी धनंजय मुंडेंच्या हस्ते प्रधानमंत्री आवास योजनेतील १२५ लाभार्थींना होणार धनादेशाचे वाटप



Beed News Live बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा परळीचे आमदार धनंजय मुंडे विधानसभा निवडणुकीत दिलेल्या प्रत्येक वचनपूर्तीच्या दृष्टीने सक्रिय असून शनिवारी (दि.१०) त्यांच्या हस्ते परळी येथील प्रधानमंत्री आवास योजनेतील १२५ लाभार्थींना धनादेश वाटप करण्यात येणार आहे. 


तसेच सकाळी नागापूर येथील वाण धरणाचे जलपूजन व दलित स्मशानभूमीचेही भूमिपूजन त्यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. सकाळी ९.०० वा. नागापूर येथील वाण धरणाचे जलपूजन संपन्न होईल, त्यांनतर सकाळी १०.०० वा. भीमनगर येथील शांतीवन स्मशानभूमीचे भूमिपूजन करण्यात येईल, त्यानंतर सकाळी ११.०० वा. स्व. लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदिर येथे पंतप्रधान आवास योजनेतील १२५ लाभार्थींना धनादेश वाटप करण्यात येतील. 


हे तीनही कार्यक्रम ना. मुंडे यांच्या शुभहस्ते संपन्न होत असून, यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आ. संजय दौंड, जिल्हाधिकारी श्री. राहुल रेखावार, नगराध्यक्ष सौ. सरोजिनीताई हालगे, गटनेते श्री. वाल्मिक अण्णा कराड यांसह आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या सर्व कार्यक्रमांच्या ठिकाणी गर्दी करू नये तसेच सोशल डिस्टनसिंगचे तंतोतंत पालन केले जावे असे आवाहन परळी नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री. अरविंद मुंढे यांनी केले आहे.