Beed News Live Update नवविवाहितेचा खून करून मृतदेह विहिरीत फेकला

 


The newlyweds were murdered and their bodies dumped in a well



नवविवाहितेचा खून करून मृतदेह विहिरीत फेकला

👉 अवघे दिड महिन्यापूर्वी लग्न झालेल्या नवविवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेत तिचा खून करून मृतदेह विहिरीत फेकल्याच्या आरोपावरून पती आणि सासऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. 

👉 ही घटना पाटोदा तालुक्यातील अंतापूर येथे उघडकीस आली आहे. संध्या उमेश गाडे (वय १८, रा. अंतापूर, ता. पाटोदा) असे त्या मृत विवाहितेचे नाव आहे. 

👉 तिचे वडील छगन सोपान तोडकर (रा. मंगरूळ, ता. आष्टी) यांनी सांगितले कि, संध्याचा विवाह दिड महिन्यापूर्वी १६ ऑगस्ट रोजी उमेश अशोक गाडे याच्यासोबत झाला होता.

👉  लग्न झाल्यापासूनच संध्याचा सासरी छळ सुरु झाला. उमेश चारित्र्यावर संशय घेऊन तिला सतत त्रास देऊ लागला. तिच्या वडिलांनी फोन केला तरी तो तिला देण्यास टाळाटाळ करत असे. सोमवारी (दि.२८ सप्टेंबर) संध्याचे आई-वडील तिला भेटण्यासाठी गेले असता तिने पतीकडून सतत होत असलेल्या छळाबद्दल त्यांना सांगितले होते. 

दोन मुलांसह मातेचा अपर पोलीस अधीक्षक कार्यालयामसोर आत्मदहनाचा प्रयत्न

👉 गुरुवारी (दि.०१) पहाटे संध्याचा सासरा अशोक रामा गाडे याने तिच्या वडिलांना फोन कारून संध्या बेपत्ता झाल्याचे सांगितले. त्यानंतर शुक्रवारी (दि.०२) सकाळी ८ वाजता त्याने पुन्हा फोन केला आणि संध्याचा मृतदेह शेतातील विहिरीत तरंगत असल्याची माहिती दिली. 

आमदार महालेंनी घेतली रहाडे कुटुंबीयांची सांत्वनपर भेट

👉 वडिलांनी तत्काळ अंतापूर येथे धाव घेत इतर ग्रामस्थांच्या मदतीने संध्याचा मृतदेह बाहेर काढला. घटनेची माहिती मिळताच अमळनेर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करून अकस्मात मृत्यूची नोंद केली. मात्र, संध्याला पोहता येत असल्याचा दावा तिच्या वडिलांनी केला. 

हेही वाचा  अभिनेत्री ड्रग्स का घेतात? राखी सावंतने केला खुलासा, म्हणाली....

👉 तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन पती आणि  सासऱ्याने तिचा खून करून मृतदेह विहिरीत फेकला अशी तक्रार त्यांनी दिली. सदर तक्रारीवरून उमेश अशोक गाडे आणि अशोक रामा गाडे या दोघांवर अमळनेर पोलीस 


आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!