आयुष्यात या गोष्टीला कधीही नाही म्हणून नका, नाहीतरी तुमची प्रगती कधीच होणार नाही !

 




मित्रांनो आपण दैनंदिन जीवनामध्ये बघतो की काही लोक एका विशिष्ट स्थरापर्यंत प्रगती करतात आणि मग तिथून पुढे त्यांची प्रगती थांबते. मग तुम्ही काही त्यांना सांगायला गेलात तर ते तुमचे ऐकत पण नाहीत. शिवाय आपल्यालाच ज्ञान देत बसतात. काही लोक तर नुसतच जगाला ज्ञान देत बसतात आणि त्यांच्या घरात थोडं डोकावून पाहाल तर असं जाणवेल की खऱ्या ज्ञानाची गरज त्यांनाच असते. असं का घडतं? याचं कारण मी आज तुम्हाला या लेखामध्ये सांगणार आहे. अश्या लोकांनी आपल्या प्रगतीच्याआड एक मोठा अडथळा स्वतःच निर्माण केलेला असतो.


मित्रांनो समजा तुमचा एक चांगला मित्र आहे त्याला नवीन नौकरीची गरज आहे, तो नवीन कंपनीच्या शोधत आहे कारण त्याला घर चालवायला पैसे कमी पडतात. तुम्हाला बाहेरच्या कंपनीबद्दल थोडं ज्ञान आहे कारण तुम्ही पण नुकतीच नवीन कंपनी बदलली आहे. आता तुम्ही काय करता तुमच्या मित्राला थोडं समजावण्याचा प्रयत्न करता की, अरे तू अश्या मार्गाने जा म्हणजे तुला यश मिळेल. त्यावर तुम्हाला तुमचा मित्र म्हणतो मला सगळं माहिती आहे रे पण बाहेरची परिस्थिती खूप वाईट आहे तू मला सांगायची काही गरज नाही.


आणि असं बोलून तो तुमचं काहीच ऐकून घेत नाही. तुम्ही त्याला अजून काही सांगायला गेलात तर तो तुम्हालाच गप्प करतो आणि आपण जे सांगतो ते कसं बरोबर नाही हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो. इथे बारकाईने पाहिले तर तुमचा एक मित्र तुमच्या चांगल्या मार्गदर्शनापासून वंचित झाला. पण नुकसान कोणाचे झाले हे अजून वेगळं सांगायला नको. अजून एक उदाहरण बघूया, समजा तुमच्या घरामध्ये एक नातेवाईक तुमच्यापेक्षा वयाने मोठे आहेत त्यांच्या घरात काही समस्या आहेत आणि त्या प्रकारच्या समस्या तुम्हाला पण आधी होत्या आणि मग योग्य त्या ज्ञानाचा मार्ग अवलंबून तुम्ही त्या सोडवल्या.


मित्रांनो इथं मी ज्ञानाचा उल्लेख केला आहे. इथे अंधश्रद्धेला अजिबात थारा नाही. मी ज्ञानाचा मार्ग म्हंटला आहे ज्याला काही शास्त्रीय आधार आहेत. मग तुम्ही तुमच्या नातेवाईकाला थोडं समजावण्याचा प्रयत्न करता किंवा त्यांना मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करता पण तुमचे नातेवाईक काय म्हणतात? मला सगळं माहिती आहे रे, आमचं सगळं करून झालंय आणि असं बोलून ते पण तुमचं काही ऐकत नाहीत. मित्रांनो मला इथं काय सांगायचंय की सर्वात मोठा अडथळा आपल्या प्रगतीच्याआड येणारा तो म्हणजे "मला सगळं माहीत आहे" हे वाक्य.


ज्यावेळेस समोरची व्यक्ती तुम्हाला चांगला सल्ला किंवा मार्ग सांगत असते आणि तुम्ही त्यांना म्हणता अरे मला माहित आहे रे, मला ह्या गोष्टींची गरज नाही. किंवा तुम्ही त्यांना म्हणता आरे तू जे सांगतोय ते ह्या पुस्तकात दिलं आहे. ज्यावेळेस तुम्ही अशी वाक्य वापरता त्यावेळेस तुम्ही ज्ञानाचे सर्व दरवाजे बंद करता कारण पूर्वी जरी तुम्ही ती गोष्ट वाचली किंवा ऐकली असेल तेंव्हा तुम्हाला ती गोष्ट फक्त समजली असेल उमजली नसेल. उमजली म्हणजे अनुभव नसेल.


पण समोरचा त्याच्या अनुभवावरून ती गोष्ट तुम्हाला संगत आहे आणि जरी तुम्हाला ती गोष्ट माहिती असली तरी त्या गोष्टीबद्दल तुमचे रिविजन होईल आणि रिविजन झल्याने फायदा तुमचाच होईल. त्यामुळे इथून पुढे असे कधीही म्हणू नका की मला ही गोष्ट माहिती आहे. समोरच्याच नीट ऐकून घ्या. काहीतरी नक्कीच नवीन भेटेल कारण त्याने ते अनुभवलंय. मित्रांनो जे महान व्यक्ती असतात ते कधीच म्हणत नाहीत की मला सगळं माहिती आहे. ते सतत ज्ञान ग्रहण करण्याचा प्रयत्न करत असतात. ते नेहमी नम्र असतात आणि ते सर्वांकडून शिकण्याचा प्रयत्न करत असतात.


ते इतके नम्र असतात की त्यांना जर त्यांच्या हाताखालच्या किंवा त्यांच्यापेक्षा वयाने लहान माणसाकडून शिकायचे असेल तरीसुद्धा ते आपला अहंकार मध्ये आणत नाहीत. त्यांना माहिती असते की प्रत्येकामध्ये काहीतरी विशेष गुणवत्ता असते. बिलगेट्स आणि वॉरेन बफे जी जगातीली सर्वात श्रीमंत माणसे आहेत ते सुद्ध नवनवीन गोष्ट सतत शिकत असतात. बिलगेट्स वर्षाला पन्नास पुस्तके वाचतात. वॉरेन बफे त्यांच्या सुरुवातीच्या काळात दिवसाला सहाशे ते एक हजार पाने वाचायचे आणि आत्ता सुद्धा ते त्यांचा 60% वेळ वाचण्यात घालवतात.


आता ही लोक तर जगातली श्रीमंत माणसे आहेत त्यांना काय गरज आहे एवढं वाचण्याची? पण त्यांना ज्ञानाचे महत्त्व कळले आहे. त्यामुळे इथून पुढे लक्षात ठेवा, कोणीही तुम्हाला त्याच्या अनुभवातून काही सांगत असेल तर त्याचं पूर्ण ऐकून घ्या. कधीही म्हणून नका मला सगळं माहिती आहे, मला याची गरज नाही. तुमच्या ज्ञानाचे दरवाजे सतत उघडे ठेवा मग बघा तुमच्या आयुष्यची कशी छान प्रगती होते. मित्रांनो लेख आवडला असेल तर आवर्जून शेअर करा.


@marathiviralstory