Gaon Majha News Beed संस्था चालकाचे सुटले आता पाथरा येथे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांचे उपोषण सुरू

 




संस्था चालकाचे सुटले आता पाथरा येथे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांचे उपोषण सुरू आमच्या वरील अन्याय दूर करा म्हणीत कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय बसले उपोषणाला बीड(दि.०३)- केज तालुक्यातील पाथरा येथील आश्रम शाळेतील कर्मचारी आणि संस्था चालक यांच्यातील वाद विकोपाला गेला असून मागील आठवड्यात संच मान्यता व इतर मागण्यासाठी संस्थेचे अध्यक्ष लहू बनसोड हे आमरण उपोषणाला बसले होते. (Gaon Majha News Beed)

आता त्यांच्या विरोधात संस्थेतून कमी केलेले कर्मचारी व त्यांचे नातेवाईक हे आश्रम शाळे समोर आपल्या मुलाबाळांसह आमरण उपोषणाला बसले आहेत. केज तालुक्यातील पाथरा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अनुसूचित जाती आश्रम शाळातील कर्मचारी आणि संस्था चालक तथा अध्यक्ष यांच्यातील अंतर्गत वाद सर्वश्रुत आहे. दि. २० ऑगस्ट रोजी संस्थेचे अध्यक्ष लहू बनसोडे हे संच मान्यता आणि इतर मागण्या संदर्भात स्वतःच्या घरी उपोषणाला बसले होते.

 त्यांचे उपोषण सुटले असून त्यांच्या विरोधात आता संस्थेचे कमी केलेले कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय हे दि. २ सप्टेंबर रोजी पाथरा येथे संस्थे समोर त्यांच्या लहान मुलांबाळासह उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या मागण्या या सुरुवाती पासून कार्यरत असलेले कर्मचारी यांचे शालेय अभिलेखे प्रमाणे कागदपत्रे तपासुन नियमा प्रमाणे नमुद कर्मचाऱ्यांना शाळेची संच व वैयक्तिक मान्यता देते वेळेस जुने कर्मचारी यांचा प्राधान्याने विचार करण्यात यावा. सर्व अभिलेखे तपासणी कामी कार्यालयाने हस्तगत करावीत. (Gaon Majha News Beed)

संस्थाप्रमुख यांच्यावर कडक प्रतिबंधात्मक कार्यवाही करुन सदरील कर्मचाऱ्यांचे नियुक्तीचे आदेश देण्यात यावे. हे प्रकरण सहाय्यक आयुक्त यांच्या कार्यालयीन स्तरावर येत नसेल तर ज्या कार्यालयाच्या अधिकार कक्षात येते त्यांना कळवावे. अंतिम निर्णय लागत नाही तो पर्यंत संस्थेला आलेल्या संच मान्यता व वैयक्तिक मान्यता प्रस्तावर निर्णय घेण्यात येवु नये. तसेच निर्णय लागे पर्यंत शाळेच्या सर्व प्रशासकीय कामकाजावर प्रतिबंध लावण्यात यावा.