अंबाजोगाईचे सुपुत्र डॉ. अनंत शिनगारे यांचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
अंबाजोगाईचे सुपुत्र डॉ. अनंत शिनगारे यांचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान
कोरोना महामारीच्या काळात मुंबई येथील जीटी (गोकुलदास तेजपाल) रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकपदाची जबाबदारी निष्ठेने पार पाडत रुग्णसेवेत अतुलनीय योगदान दिल्याबद्दल डॉ. अनंत कारभारी शिनगारे यांचा महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते राजभवनात आयोजित कार्यक्रमात सन्मान करण्यात आला. यावेळी वैद्यकीय शिक्षण आणि संशोधनचे संचालक डॉ. तात्याराव लहाने हे उपस्थित होते. डॉ. अनंत शिनगारे हे अंबाजोगाईचे सुपुत्र असून सध्या मुंबईच्या जेजे रुग्णालयात सहयोगी प्राध्यापक आहेत.
हेही वाचा दलित युवतीवर सामूहिक बलात्कार
डॉ. अनंत शिनगारे यांनी अनेक वर्ष अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात निवासी वैद्यकीय अधिकारीपदाची जबाबदारी पार पाडली. २०१६ साली अंबाजोगाई येथे झालेल्या महाआरोग्य शिबिरातील उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला होता. त्यानंतर डॉ. शिनगारे यांनी जळगाव शासकीय रुग्णालयात कर्तव्य बजावले. दोन वर्षापूर्वी त्यांची बदली मुंबईला झाली.
हेही वाचा तर बॉसने पँटच घातली नव्हती
तिथे जीटी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकपदी असताना कोरोनाची साथ सुरु झाली आणि विशेषतः मुंबईत वेगाने फैलाव झाला. अशा वेळी डॉ. शिनगारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र रुग्णसेवेत योगदान दिले. याची दखल घेत बुधवारी राजभवन येथे डॉ. शिनगारे यांच्यासह मुंबईतील सेंट जॉर्ज रूग्णालय, द कामा ॲण्ड ॲलब्लेस रूग्णालय, गोकुलदास तेजपाल (जीटी) रूग्णालय आणि जे.जे. रूग्णालयातील ३३ कोविड वॉरियर्सचा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
टिप्पणी पोस्ट करा