निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी उमेदवार झाला चक्क म्हशीवर स्वार - कुठे वाचा सविस्तर...

यांचं भलतच! बिहारमध्ये निवडणुकीचा अर्ज भरण्यासाठी उमेदवार झाला चक्क म्हशीवर स्वार


बिहार विधानसभेच्या 243 जागांसाठी 28 ऑक्टोबरपासून 3 टप्प्यात मतदान होणार असून 10 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.

निवडणुकीच्या काळात प्रसिद्धीसाठी उमेदवार अनेक फंडे वापरतात. कोण कधी काय करेल याचा काही नेम नाही. राज्यात सध्या निवडणुकीचं वातावरण तापलेलं आहे. पहिल्या टप्प्यातल्या निवडणुकीसाठी फॉर्म भरण्याची लगबग सुरू आहे. यात एका अपक्ष उमेदवाराने जिल्हाधिकारी कार्यालयात येण्यासाठी म्हशीवरूनच मिरवणूक काढली.

अभिनेत्री यांच्या विचित्र सवयी जाणून घेतल्यास हैरान होऊन जाल…!

दरभंगा जिल्ह्यातल्या बहादुरपूर विधानसभा मतदार संघासाठी अपक्ष उमेदवार म्हणून नचरी मंडल यांनी अर्ज भरला.  हा अर्ज भरण्यासाठी ते चक्क म्हशीवर बसून आले. सोबत मोजके समर्थक आणि या उमेदवाराची म्हशीवरची स्वारी असा प्रकार पाहून लोकही आश्चर्य चकित झालेत.

ही अभिनेत्री आपल्या पतीला म्हणाली होती अंकल, नाव एकूण हैराण व्हाल…!

बिहार विधानसभेच्या 243 जागांसाठी  28 ऑक्टोबरपासून 3 टप्प्यात मतदान होणार असून 10 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.

अब्दुल कलाम यांना तीन मुले होती, जाणुन घ्या त्यांच्याबद्दल !

बिहारमध्ये निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात 28 ऑक्टोबरला, दुसऱ्या टप्प्यात  3 नोव्हेंबरला तर तिसऱ्या टप्प्यात 7 नोव्हेंबरला मतदान होईल. तर 10 नोव्हेंबरला मतमोजणीनंतर निवडणुकीचे निकाल समोर येतील.  दरम्यान,  विधानसभेचा कार्यकाळ 29 नोव्हेंबरला संपणार आहे. त्यामुळं नवीन सरकार हा कार्यकाळ संपण्याआधी स्थापन होणं गरजेचं आहे.


निवडणुकीसाठी एक तास मतदानाची वेळ वाढविण्यात आली आहे.  सकाळी 7  ते सायंकाळी 6 पर्यंत मतदान होणार आहे. शेवटच्या एका तासात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. सुरक्षेची सर्व काळजी घेऊन हे मतदान होणार असल्याचं निवडणूक आयोगाने सांगितलं होतं.


मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली NDA निवडणूक लढवत असून राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस यांनी महाआघाडी स्थापन केली आहे. आत्तापर्यंत NDAमध्येच असलेल्या लोक जनशक्ती पक्षाने विधानसभा निवडणुकांआधी वेगळी वाट धरली आहे. आपलं भाजपसोबत भांडण नाही. मात्र नितीश कुमार यांचं नेतृत्व मान्य नाही असं LJPचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मी हनुमान असल्याचंही ते म्हणाले.


पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षाला भाजपची फूस असल्याचा आरोप होत होता. त्यामुळे भाजपने त्यांना पंतप्रधान मोदी यांचा फोटो वापरण्यास मनाई केली आहे. त्यावर बोलताना चिराग पासवान म्हणाले,  मुख्यमंत्री नितीश कुमार यांना सर्वात जास्त आक्षेप आहे. पंतप्रधान मोदी हे माझ्या ह्रदयात आहेत. मी त्यांचा हनुमान आहे. गरज पडली तर मी छाती फाडून ते दाखवून देऊ शकतो असंही चिराग पासवान यांनी सांगितलं.