Beed News Live Update दोन मुलांसह मातेचा अपर पोलीस अधीक्षक कार्यालयामसोर आत्मदहनाचा प्रयत्न
Attempt of self-immolation of mother with two children in front of Additional Superintendent of Police office
💁♂️ दोन मुलांसह मातेचा अपर पोलीस अधीक्षक कार्यालयामसोर आत्मदहनाचा प्रयत्न
केज तालुक्यातील लाडेवडगाव येथील बाबासाहेब चंद्रभान लाड (Babasaheb Chandrabhan Lad) यांच्या खुन प्रकरणाचा तपास सीआयडी मार्फत करावा, यासह विविध मागण्यासाठी मयताच्या पत्नीने आपल्या दोन मुलांसह शुक्रवारी (दि.०२) दुपारी १२ च्या सुमारास अपर पोलीस अधीक्षक कार्यालयात घुसून अंगावर डिझेल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. Beed Police
हेही वाचा दलित युवतीवर सामूहिक बलात्कार
परंतु पोलीसांनी सतर्कता दाखवत लागलीच हस्तक्षेप करून या तिघांनाही ताब्यात घेतले. लाडेवडगाव येथील बाबासाहेब चंद्रभान लाड (Babasaheb Chandrabhan Lad) यांचा १७ जुलै रोजी खून झाला. या प्रकरणाचा तपास योग्य रितीने होत नसल्याचा आरोप करत मयताची पत्नी मोहर लाड यांनी गृहमंत्र्याकडे आत्मदहनाची तक्रार केली. [Beed News Live Update ]
त्यानंतर संपूर्ण पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली. विविध वृत्तपत्रांमधून आत्मदहनाच्या इशाऱ्याच्या बातम्या देखील आल्या. शुक्रवारी (दि.०२) मयताची पत्नी मोहर, ऋषीकेश (वय १४), शुभम (वय १२) हे तिघे जण लाडेवडगाव येथून सकाळी अंबाजोगाईला निघाले. इशाऱ्याचा पार्श्वभूमीवर यशवंतराव चव्हाण चौकातच पोलीसांनी बंदोबस्त लावला होता. तसेच अपर पोलीस अधीक्षक कार्यालयापर्यंत रस्त्यावर साध्या वेशात पोलीस तैनात केले होते. Beed Police
परंतु सदरील महिलेने आपल्या दोन मुलांसह मुख्य रस्ता व चौक वगळुन मोरेवाडीतून एका बोळीतून पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे धाव घेतली. प्रवेशद्वारावर तिघांच्या हातात असणार्या डिझेलने भरलेल्या बाटल्या अंगावर ओतुन घेत तिघांनीही एकच टाहो फोडला. तैनात असलेल्या पोलिसांनी सतर्कता दाखवत तत्काळ हस्तक्षेप करून तिघांनाही ताब्यात घेतले. याप्रकरणी शहर पोलीसात आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला. Beed Police
टिप्पणी पोस्ट करा