Beed Live News 50 लाख देतो मुख्यमंत्री पद सोडा!
Beed Live News Update
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ [Chief Minister Yogi Adityanath] यांना 50 लाख रुपये देतो त्यांनी मुख्यमंत्री पदाची खुर्ची सोडावी,’ अशी संतप्त प्रतिक्रिया हाथरस सामूहिक बलात्कार पीडितेचे काकांनी उल्हासनगरमध्ये दिली आहे. योगी सरकारने पीडित कुटुंबाला 25 लाखांची मदत जाहीर केली, या आश्वासनावर आमचा विश्वास नसल्याचेही ते म्हणाले.
शरद पवारांनी कोरोनाची लस घेतली का? नेमकं काय म्हणाले पवार,वाचा
हेही वाचा दलित युवतीवर सामूहिक बलात्कार
उल्हासनगर [Ulhasnagar] शहरात राहाणारे पीडितेचे मोठे काका, चुलत भाऊ यांनी अखिल भारतीय नवयुवक वाल्मिकी संघाच्या वतीने आज उल्हासनगर तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला होता [Ulhasnagar Tehsildar Office] . आमच्या मुलीवर बलात्कार करून हत्या केली, तिला अग्नी देण्याचा अधिकार पण पोलिसांनी हिरावून घेतला, त्या पोलिसांना आरोपी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली, शिवाय हे दुष्कर्म करणा-या आरोपींना फाशी द्यावी, अशीही मागणी केली
टिप्पणी पोस्ट करा