योगेश्वरी शिक्षण संस्थेत मिळते सर्वांनाच समतेची वागणूक

 


योगेश्वरी शिक्षण संस्थेत मिळते सर्वांनाच समतेची वागणूक


 💁‍♂️ योगेश्वरी शिक्षण संस्थेत मिळते सर्वांनाच समतेची वागणूक


अंबाजोगाई येथील सुप्रसिद्ध योगेश्वरी शिक्षण संस्थेतील एका प्राध्यापकावरील कथित अन्याय प्रकरणात संस्थेची बाजू मांडण्यासाठी शिक्षक आणि प्राध्यापकांपाठोपाठ आता कर्मचारीही पुढे आले आहेत. एका संघटनेच्या माध्यमातून संस्थेवर करण्यात आलेले आरोप निखालस खोटे असून संस्थेत सर्वांना समतेची वागणूक देण्यात येत असल्याचे वरिष्ठ महाविद्यालय आणि तंत्रनिकेतन कर्मचाऱ्यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे. एका प्राध्यापकाच्या असभ्य वर्तनावर पांघरून घालण्यासाठी काही लोकांचा खटाटोप सुरु असल्याचेही कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.  


पत्रकात सांगण्यात आले आहे कि, संस्थेच्या योगेश्वरी महाविद्यालयामध्ये दि.७ ऑक्टोबर रोजी प्राचार्य यांच्या कक्षात येवून स्वाभिमानी मुफ्टा शिक्षक नामक अज्ञात संघटनेच्या काही सदस्यांद्वारे संस्थेचेअध्यक्ष, पदाधिकारी व प्राचार्य यांच्या विषयी अत्यंत वाईट असे अपशब्द वापरून महाविद्यालयाच्या प्राचार्यासोबत शिवराळ भाषेत हुज्जत घातली. 


कोरोनामुळे जमावबंदी लागू असतानाही एका अज्ञात संघटनेच्या ५० ते ६० कथीत कार्यकर्त्यांनी महाविद्यालयाच्या प्राचार्याच्या कक्षात येवून दबावतंत्र वापरत प्राचार्यांना धमकावण्याचा प्रकार अत्यंत दुर्देवी व शासकीय कामात अडथळा आणणे यानुसार गुन्हा असून शासनाच्या नियमाचे उल्लंघन आहे.


स्वातंत्रपुर्व काळापासून श्री योगेश्वरी शिक्षण संस्थेद्वारे समाजातील दीन, दलित, शोषित घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहाला जोडण्यासाठी पर्यायाने बहुजन समाजाला 'आत्मनिर्भर' करण्यासाठी संस्था अहोरात्र कार्य करित आहे. 


संस्थेच्या १०२ वर्षाच्या इतिहासात संस्था व्यवस्थापनाकडून सर्व जाती व धर्मातील प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना नेहमीच समतेची वागणूक देण्यात आलेली आहे. इतकेच नव्हे तर बहुजन समाजातील अनेक कर्मचाऱ्यांना संस्थेने सभासदत्व देवून संस्थाचालक म्हणून कार्य करण्याची संधी दिलेली आहे.