अबब...! चीनमध्ये एकाच वेळी दिसले 3 सूर्य

अबब...! चीनमध्ये एकाच वेळी दिसले 3 सूर्य


अबब...! चीनमध्ये एकाच वेळी दिसले 3 सूर्य

⚡ अनेकदा निसर्ग आपली थक्क करुन टाकणारी रुपं दाखवत असतो. असंच निसर्गाचं दुर्मीळ रुप चीनच्या मोहे शहरात पाहायला मिळालं. 

🌤️ या ठिकाणी शनिवारी (17 ऑक्टोबर) लोक सकाळी उठले, तर त्यांना आकाशात चक्क 3 सूर्य पाहायला मिळाले. हे पाहून तेथील लोक चकित झाले. 

👀 ही दुर्मीळ घटना जवळपास 3 तास आकाशात पाहायला मिळाली. त्यामुळे अनेकांनी ही मनमोहक दृश्य आपल्या कॅमेऱ्यात कैद केली. 

🧐 काय आहे सत्य ? : 

▪️ चीनच्या मोहे शहरात एकाच वेळी दिसलेल्या 3 सूर्यांपैकी 2 मात्र खरे नव्हते. ‘सन डॉग’ या घटनेमुळे एका सूर्याऐवजी 3 सूर्य पाहायला मिळत होते. 

▪️ हा एक प्रकारचा दृष्टीभ्रम आहे. जेव्हा आकाशात खूप उंचीवर सूर्य किरणं बर्फामधून जातात तेव्हा एका सूर्याच्या ठिकाणी अधिक सूर्यांचा भास होतो. 

▪️ मूळ सर्याच्या अवतीभवती दिसणाऱ्या या चमकणाऱ्या स्पॉट्सला फँटम सन म्हणतात. हा दुर्मीळ नैसर्गिक योग चीनच्या लोकांनी जवळपास 3 तास पाहिला. 

📍 दरम्यान, चीनमधील मोहे शहरातील या घटनेचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.