आ विनायक मेटेंनी थेट शेतातील चिखलात उतरत शेतकऱ्यांचे दुःख सरकारला दाखवले
बीड बातम्या : शिवसंग्राम संस्थापक अध्यक्ष आमदार. विनायक मेटे यांनी काल दि १७ ऑक्टोबर २०२० रोजी शिरूर व बीड तालुक्यातील नुकसान पाहणीचा दौरा केला. यामध्ये त्यांनी थेट शेतात अतिवृष्टीने झालेल्या चिखलात उतरत राज्य सरकारला शेतकऱ्यांची दयनीय स्थिती दाखवली.
यावेळी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई सोडावी, शेतकऱ्यांच्या मदतीला सातत्याने येणाऱ्या स्व बाळासाहेब ठाकरे यांचा वारसा अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ हेक्टरी ५० हजार रुपये मदत देऊन सिद्ध करावा असे आवाहन यावेळी आ विनायक मेटे यांनी केले.
टिप्पणी पोस्ट करा