Beed Live News मुंबईत ब्लॅकमेल करून महिलेवर 2 वर्षे सतत बलात्कार केला Woman raped in Mumbai for 2 years
Beed Latest News Live
उत्तर प्रदेशातील हाथरस घटनेवरून देशभरात संताप व्यक्त केला जात असतानाच, महाराष्ट्रातील मुंबईतही एका 22 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. बलात्काराचा व्हिडिओ काढून ब्लॅकमेल [Blackmail by video Makin Video Mumbai] करून दोन वर्षे या महिलेवर तिघा जणांनी बलात्कार केला. दिंडोशी पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला असून, यातील दोन आरोपींना अटक केली आहे.
हेही वाचा दलित युवतीवर सामूहिक बलात्कार
मुंबईतील मालाड परिसरात ही घटना घडली. फयाज शेख (वय 31) आणि सादिक पटेल (वय27) या दोघांना दिंडोशी पोलिसांनी अटक केली आहे. तर नदीम हा तिसरा आरोपी फरार आहे. पीडित महिला मालाडच्या पूर्वेला राहते. आरोपींनी ब्लॅकमेल करून तिच्यावर दोन वर्षे बलात्कार केला. पीडित महिला पती आणि अडीच वर्षांच्या मुलासोबत राहते. शेख आणि महिला एकाच परिसरात राहत असून, तो तिला आणि पतीला ओळखत होता. पीडितेच्या तक्रारीनुसार, 2018 मध्ये शेखने तिला कॉल केला. काही कामानिमित्त तिला घरी बोलावून घेतले. चाकूचा धाक दाखवून तिच्यावर बलात्कार [Rape] केला. त्याचा व्हिडिओ त्याने शूट केला [Blackmail by video Makin Video Mumbai] . याबाबत वाच्यता केली तर अॅसिड टाकून मारण्याची धमकी दिली. त्यानंतर तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने तिच्यावर वारंवार बलात्कार केला.
वर्षभरानंतर शेख याने बलात्काराचा व्हिडिओ आणि तिचा फोन नंबर पटेल याला दिला. त्यानेही महिलेला ब्लॅकमेल केले आणि तिच्यावर अनेकदा बलात्कार केला. याबाबत नदीमला माहीत झाले. त्यानेही महिलेला कॉल करून धमकावण्यास सुरुवात केली. याबाबत पतीला सांगेन अशी धमकी दिल्यानंतर ती घाबरली. आपला संसार वाचवण्यासाठी ती नदीमला भेटण्यास तयार झाली. त्यानंतर नदीमनेही तिच्यावर बलात्कार केला. इतक्यावरच आरोपी थांबले नाहीत. त्यांनी आणखी एका मित्राला तिचा फोन नंबर दिला. त्यानेही तिला फोन करून धमकावण्यास सुरुवात केली.
मुंबई सोडली तर आपल्याला होणारा हा त्रास किमान थांबेल असं तिला वाटलं. ती आपल्या मूळगावी गेली. सहा महिने ती तिथे होती. मात्र, आरोपी तिला ब्लॅकमेल करत होते. अखेर या त्रासाला कंटाळून तिने ही बाब आपल्या पतीला सांगितली. मुंबईत परतल्यानंतर त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. 29 सप्टेंबरला पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. दिंडोशी पोलिसांनी दोघांना अटक केली. तर तिसरा आरोपी नदीम हा अद्याप फरार आहे. त्याचा शोध घेतला जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा