वीज पुरवठा सुरळीत करा- आ.संदिप क्षीरसागर - Strengthen power supply- MLA Sandeep Kshirsagar Beed

 



 

💥 वीज पुरवठा सुरळीत करा- आ.संदिप क्षीरसागर

शहरात व ग्रामीण भागात वीज पुरवठा अचानकपणे खंडीत होतो तर काही ठिकाणी तांत्रिक बिघाड झाल्यानंतर तासनतास वीज पुरवठा सुरू केला जात नाही अशा तक्रारी आल्यानंतर तातडीने वीज पुरवठा सुरळीत करा, अशा सूचना महावितरणच्या आढावा बैठकीत आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांनी अधिकार्‍यांना दिल्या आहेत.

विधानसभा क्षेत्रातील बीड व शिरूर तालुक्यातील महावितरणच्या संदर्भात शेतकर्‍यांच्या, नागरिकांच्या, व्यापार्‍यांच्या अनेक तक्रारी येत असल्याने आढावा बैठकीचे आयोजन आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. 

या महावितरणच्या आढावा बैठकीला कार्यकारी अभियंता गाडे, भारंबे, आहेर व इतर अधिकारी उपस्थित होते. या आढावा बैठकीत महावितरण संदर्भातील नागरिकांच्या तक्रारी, 

सबस्टेशन निहाय प्रस्तावित व नव्याने करावयाची कामे, डिपी, नवीन वीज पुरवठा लाईन व नागरिकांची मागणी लक्षात घेता करावयाची कामे याबाबत अधिकार्‍यांनी माहिती दिली. 

बीड व शिरूर तालुक्यातील महावितरणच्या कामाबाबत सबस्टेशन निहाय नागरिकांच्या, शेतकर्‍यांच्या मागणीनुसार आराखडा बनवून त्यावर काम करण्याच्या सूचना या बैठकीत देण्यात आल्या. या महावितरणच्या आढावा बैठकीला अधिकारी, कर्मचार्‍यासह पदाधिकार्‍यांची उपस्थित होती.



Strengthen power supply- MLA Sandeep Kshirsagar

In the review meeting of MSEDCL, MLA Sandeep Bhaiya Kshirsagar has instructed the officials to immediately restore the power supply in urban and rural areas if there is a sudden power outage.

The review meeting was organized in the presence of MLA Sandeep Bhaiya Kshirsagar as there were many complaints from farmers, citizens and traders regarding MSEDCL in Beed and Shirur talukas.

Executive Engineer Gade, Bharamba, Aher and other officers were present at the review meeting of MSEDCL. In this review meeting, complaints of citizens regarding MSEDCL,

The officials informed about the proposed and new works to be done according to the substation, DP, new power supply line and the work to be done keeping in view the demand of the citizens.

Regarding the work of MSEDCL in Beed and Shirur talukas, instructions were given in this meeting to make a plan as per the demand of substation wise citizens and farmers. Officers, staff and office bearers were present at the review meeting of MSEDCL.