१२ हजार डुक्करांना ठार मारण्याचे आदेश, कारण... Order to kill 12,000 pigs, because ...



आसामचे मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी ऑक्टोबरच्या अखेरपर्यंत आफ्रिकन स्वाईन फिव्हरने(ASF) प्रभावित झालेल्या भागामधील 12 हजार डुकरांना ठार मारण्याचे आदेश दिले आहेत. कोविड 19 लॉकडाऊनमुळे आसामच्या पोल्ट्री क्षेत्रात आधीच परिणाम झाला असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याच वेळी, आता आफ्रिकन स्वाइन तापमुळे राज्यात 18 हजार डुकरांचा मृत्यू झाला आहे. पहिला एएसएफ प्रकरण मे महिन्यात समोर आलं होतं.

डुक्कर फार्मच्या मालकांचं म्हणणं आहे की, सरकारची आकडेवारी चुकीची आहे, कारण या रोगामुळे १ लाखाहून अधिक डुकरांचा मृत्यू झाला आहे. आजारावर कोणतीही लस नाही आणि त्याचा मृत्यू दर 90 ते 100 टक्के आहे. सरकारकडून मदत किंवा नुकसान भरपाई देण्यात आली नसल्याची तक्रार शेतकर्‍यांनी केली आहे.[World News: Find the Latest world news headlines, US elections 2020 news, international breaking news today from around the world. Check out the today] 'वर्ल्ड ऑर्गनायझेशन फॉर अ‍ॅनिमल हेल्थ' च्या म्हणण्यानुसार, एएसएफ हा एक व्हायरल आजार आहे, जो पाळीव आणि वन्य डुक्करांवर परिणाम करतो. हा आजार प्राण्यांपासून मनुष्यापर्यंत पसरत नाही. दूषित चारा आणि शूज, कपडे, वाहने, चाकू यासारख्या वस्तूंद्वारेही याचा प्रसार होऊ शकतो.

पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय विभागाचे आयुक्त सचिव श्याम जगन्नाथन यांनी मे महिन्यापासून केलेल्या अंदाजांचा हवाला देत सांगितलं की, सुमारे 18 हजार डुकरांचा मृत्यू झाला आहे. सोनोवाल यांनी दुर्गा पूजा उत्सवापूर्वी 12हजार संक्रमित डुकरांना ठार मारण्याचे आदेश दिले आहेत. प्रोटोकॉलनुसार मृत डुकरांच्या नमुन्यांची तपासणी एका भागात केली जाईल आणि एएसएफची लागण झाल्याची खात्री झाल्यास त्याभोवती सुमारे एक किमी एपिकेंटर(उपकेंद्र) परिसर म्हणून घोषित केला जाईल. मग त्या भागातील सर्व डुकरांना शिक्का मारून ठार मारण्यात येईल.

केंद्राच्या बाहेरील 1 किमी क्षेत्राला सर्विलांस झोन आणि त्यानंतर 9 किमीचा बफर झोन असे म्हणतात. राज्यातील 13 जिल्ह्यांमध्ये 33एपिकेंटर आहेत. शेजारच्या राज्यांमधून आसाममध्ये होणाऱ्या डुकरांच्या आयातीवर बंदी घातली आहे. 2019 च्या पशुगणनेनुसार आसाममध्ये डुक्करांची संख्या सर्वाधिक आहे. राज्यात सुमारे 21लाख डुक्कर आहेत.



Assam CM orders killing of 12,000 pigs in the state; Find out because ...

Assam Chief Minister Sarbananda Sonowal has ordered to kill 12,000 pigs in the area affected by the African Swine Fever (ASF) by the end of October. The Kovid 19 lockdown has already affected the poultry sector in Assam, officials said. At the same time, 18,000 pigs have now died in the state due to African swine fever. The first ASF case was reported in May.

Owners of pig farms say the government's figures are inaccurate, as the disease has killed more than 100,000 pigs. There is no vaccine for the disease and its mortality rate is 90 to 100 percent. The farmers have complained that no help or compensation has been given by the government. According to the World Organization for Animal Health, ASF is a viral disease that affects domestic and wild pigs. The disease does not spread from animals to humans. It can also be spread through contaminated fodder and items such as shoes, clothing, vehicles, knives.

Shyam Jagannathan, Commissioner, Department of Animal Husbandry and Veterinary Medicine, citing estimates made since May, said that about 18,000 pigs have died. Sonowal has ordered the killing of 12,000 infected pigs before the Durga Puja celebrations. According to the protocol, samples of dead pigs will be tested in one area and if ASF is confirmed to be infected, about one km around it will be declared as epicenter (substation) premises. Then all the pigs in that area will be sealed and killed.

The 1 km area outside the center is called the Surveillance Zone followed by the 9 km buffer zone. There are 33 epicenters in 13 districts of the state. Import of pigs from neighboring states to Assam has been banned. According to the 2019 livestock census, Assam has the highest number of pigs. There are about 21 lakh pigs in the state.