एक हृदयस्पर्शी कथा...[ Love Diary ] A heart touching story ...



एक हृदयस्पर्शी कथा ...

आजच्या कहाणीचा हिरो आहे सागर आणि हिरोईन आहे

नमिता.दोघांचाही जन्म एकाच दिवशी एकाच

हॉस्पीटलमध्ये झाला,त्या हॉस्पीटलमध्ये

अडचणीच्या कारणास्तव एकाच बेडवर ठेवण्यात

आलं,तेव्हाच त्याने तिच्या हाताला पहील्यांदा स्पर्श

केला.तेव्हा ते दोघेही एका वेगळ्या उर्जेने

थरथरले.कदाचित त्याने तिच्यावरचं प्रेम त्याने व्यक्त

केलं असावं।सागरचे आईवडील हे मुळचे आणि पुण्याचे

आणि नमिताचे कोल्हापुरचे।आज

त्या दोघांचाही तिसरा व...ाढदिवस आहे.आणि यामुळेच

तर सागरचे वडील सागरच्या ऊदंड

आयुष्यासाठी कोल्हापुरच्या महालक्ष्मीच्या दर्शणाला घेऊन

आलेत.नमितालासुद्धा तिचे आईवडील याच कारणास्तव

महालक्ष्मीच्या मंदिरात घेऊन आलेत.दर्शन घेऊन

निघताना त्या छोट्या नमिताच्या हाताला सागरच्या त्या बोटांचा स्पर्श

होतो जो पहील्यांदा दवाखान्यात झाला होता.तीने

त्याच्याकडे बघुन एक गोड स्माईल केली,तेव्हा कदाचित

त्याला वाटलं असावं की कदाचित हीने

मला ओळखलंय.ही त्यांची दुसरी भेट.वरचासुद्धा काय

काय घडवुन आणतोय हे कोणाला कधी कळलंय का?

पुढे वाचा तिसरी भेट तर याहीपेक्षा intresting

आहे.त्या दोघांचं एकाच कॉलेजमध्ये अॅडमिशन झालंय.आज

कॉलेजचा पहीला दिवस दोघांनाही यायला खुप उशीर

झालाय(उशीर तर व्हायचाच ना नाहीतर नशीब

पुढचा खेळ कसा खेळणार).दोघेही क्लासकडे

धावताहेत,धावताहेत,धावताहेतthink in slow

motion.आणि त्याच गडबडीत

त्या दोघांची एकमेकांशी टक्कर होते.त्या धक्क्यामुळे

तिच्या हातातुन पडलेलं पुस्तक तो तिच्या slow

motion मध्ये उडणार्या केसाकडे बघत तिच्या हातात

देत असतो.त्याच्या हाताचा तिला स्पर्श

होताच,दोघांनाही एका वेगळ्या उर्जेची जाणीव होते

जी आम्ही आधी कधीतरी अनुभवलीय.नमिता न राहुन

सागरला विचारतेय,आपण आधी कधी भेटलोय का?माहीत

नाही पण मलाही तसंच वाटतं.आणि फक्त याच कारणामुळे

त्यांची मैत्री होते.मग हळुहळु हीच मैत्री प्रेमात

बदलते.एकमेकांना चोरुन भेटणं,भेटवस्तु देणं,तिला फुले

आणुन देणं हे तर कायमचंच झालं...

त्यांच प्रेम जोरावर असताना मग अचानक नशीबाने

आपली चाके उलट्या दिशेने फिरवली.तिची काळजीखातर

विचारली गेलेली प्रश्ने याला dominating वाटु

लागली.परीक्षेमुळे त्याचं अभ्यासात बुडणं

नमिताला तो मला टाळतोय असं वाटु लागलं.एकमेकांच्

या वाटेवर डोळे लावुन बसणारे ते आज

एकमेकांच्या वाटेवरुन जाणे टाळु लागले.आज

त्या दोघांनी अधिकृतपणे breakup केला.जो मनातुन

आधीच झाला होता.नशीब आज त्यांच्यावर हसत

होतं,होतं काय आणि झालं काय?शिक्षण संपल्यानंतर

दोघांचही वेगवेगळ्या वक्तींशी लग्न झालं

आणि तेही एकाच दिवशी.आज ते

त्यांच्या वेगवेगळ्या संसारात सुखी आहेत असं म्हणता तर

येणार नाही पण त्यांना जे हवं ते त्यांनी साध्य केलंय..

आज 1993

त्यांनी आपल्या वयाची साठी ओलांडलीय.नशीबाने

त्यांना पुन्हा एकदा जवळ आणलंय असं म्हणायला हरकत

नाही.कारण ते दोघेही आज मुंबईच्या लोकल ट्रेनने

प्रवास करतायेत.पण वेगवेगळ्या डब्यात

बसलेत.दोघांनाही एकमेकांच्या अस्तीत्वाची जाणीव

नव्हती.तेवढ्यात ट्रेनमध्ये धडाम करुन स्फोट

झाला.होत्याचं नव्हतं झालं.अतिरेक्यांनी घडवुन

आणलेल्या त्या बॉम्बस्फोटामध्ये मृत लोकांची जी लिस्ट

जाहीर करण्यात आली त्यामध्ये सागर

आणि नमिता यांची नावंही होती.त्यांचे शव

बचावकार्यातील कर्मचारी दोघेजण दोन विरुद्ध

दिशेला नेत असताना.त्यांचा हातांचा स्पर्श

जेव्हा एकमेकांना होतो तेव्हा,त्याच स्पर्शातील

उर्जेने त्यांची शरीरं पुन्हा एकदा थरथरतात.तेव्हा ते

शव नेणार्यांना वाटते की हे जीवंत असावेत.पण पुर्ण

तपासणीअंती कळतं की खरंच त्यांचा मृत्यु झालाय......

जन्माची सुरुवात त्या एका गोड स्पर्शाने

होते,शेवटही अशाच स्पर्शाने होते,मात्र

यावेळी त्यातली जाणीव वेगळी असते.खरंच नशीब

एखाद्याच्या आयुष्यात काय काय

करतं.मित्रांनो नशीबावर विश्वास

ठेवण्यापेक्षा स्वतःच्या creativity वर विश्वास जास्त

ठेवावा.कारण तुम्हालाच या गोष्टीची कधी जाणीव

नसते की तुम्ही काय काय करु शकला असता किँवा करु

शकता.आणि मग नंतर नशीबाला दोष देत बसता....!!!

मी लिहीलेली ही प्रेमकथा कशी वाटली ते

नक्की कळवा..........!!!