बीड शहरातील मलेरिया, चिकनगुनियाचा वाढता प्रादुर्भाव - Increasing incidence of malaria, chikungunya in Beed city
बीड शहरातील मलेरिया, चिकनगुनियाचा वाढता प्रादुर्भाव
👉 कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामध्ये आता शहरात नगरपरिषदेच्या ढिसाळ कारभाराने चिकनगुनिया, मलेरिया, डेंग्यूचे आजार वाढले आहेत.
👉 याबाबत नगरपरिषदेने प्रतिबंधात्मक उपाययोजना कोणत्याही केलेल्या नसून बीडकरांच्या आरोग्याला धोका पोहोचेल अशीच व्यवस्था नगरपरिषदेकडून करण्यात येत असल्याचा आरोप शिवसंग्राम विद्यार्थी आघाडी सरचिटणीस प्रशांत डोरले यांनी केला आहे.
👉 यंदाच्या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे, या वाढत्या पावसामुळे शहरात ठिकठिकाणी नगरपरिषदेच्या हलगर्जीपणामुळे पाणी साचते, नाल्या तुंबतात.
👉 यातूनच रोगराई पसरत असून शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शहरात चिकनगुनिया, डेंग्यू, मलेरियाचे रुग्ण प्रचंड प्रमाणात वाढले आहेत.
👉 मात्र यावर नगरपरिषदेकडून डास प्रतिबंधक फवारणी व इतर उपाययोजना होणे आवश्यक होते, पाण्याचा पुरवठा देखील नगरपरिषदेकडून अस्वच्छ केला जात असल्याचा आरोप प्रशांत डोरले यांनी केला आहे.
Increasing incidence of malaria, chikungunya in Beed city
Chikungunya, malaria and dengue have been on the rise in the city due to the increasing incidence of corona.
Prashant Dorle, General Secretary, Shiv Sangram Vidyarthi Aghadi, has alleged that the Municipal Council has not taken any preventive measures in this regard and is making such arrangements that will endanger the health of the bidders.
It is raining heavily this year.
This is spreading the disease and endangering the health of the citizens of the city. Chikungunya, dengue, malaria patients have increased tremendously in the city.
However, the city council had to take mosquito repellent spraying and other measures.
टिप्पणी पोस्ट करा