महाराष्ट्रत राष्ट्रपती राजवट लागू ...... Implementing presidential rule is not fun; Pawar's



इन्कम टॅक्सच्या [Income tax] नोटिसा पाठवून राजकीय विरोधकांना त्रास देण्याचा केंद्र सरकारचा अजेंडा आहे. मलाही इन्कम टॅक्सची नोटीस आली आहे. आमच्यासारख्या काही लोकांवर त्यांचं विशेष प्रेम आहे,' असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार [NCP President Sharad Pawar] यांनी मोदी सरकारला हाणला आहे.

केंद्र सरकारनं आणलेला कृषी कायदा व त्याला होणाऱ्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत पवार बोलत होते. केंद्र सरकारवर त्यांनी यावेळी जोरदार टीका केली. 'आयकर विभागानं २००९, २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीतील प्रतिज्ञापत्राच्या संदर्भात मला नोटीस पाठवली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांच्या प्रतिज्ञापत्राबद्दल काही तक्रारी आहेत. त्यांच्यानंतर मलाही नोटीस आली आहे. सुप्रियाला काल दिली जाणार होती, पण आधी मला आली. तिला देखील नोटीस येणार आहे असं कळलंय. चांगली गोष्ट आहे. आमच्याबद्दल त्यांना विशेष प्रेम आहे याचा आनंद आहे, असं पवार म्हणाले. 'निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मला नोटीस पाठवण्यात आली आहे. काही बाबतीत स्पष्टीकरण मागवलं आहे. लवकरच मी त्यास उत्तर देणार आहे. उत्तर न दिल्यास दिवसाला १० हजारांचा दंड भरावा लागेल असंही त्यात नमूद करण्यात आल्याचं पवारांनी सांगितलं.

करोना रुग्णांची महाराष्ट्रात वाढत असलेली संख्या, सुशांतसिंह राजपूत [Sushant Singh Rajput]  आत्महत्या प्रकरण, कंगना राणावत [Kangana Ranaut] व शिवसेनेमधील वादाचं निमित्त करत महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली जात होती. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, खासदार नवनीत राणा यांच्यासह काही जणांनी तशी मागणी केली होती. ही मागणी करणाऱ्या शरद पवारांनी टोला हाणला. 'राष्ट्रपती राजवट लागू करणं म्हणजे गंमत नव्हे आणि महाराष्ट्रात त्याची काही गरज नाही,' असं पवार म्हणाले.



Implementing presidential rule is not fun; Pawar's 

The central government's agenda is to harass political opponents by sending income tax notices. I have also received an income tax notice. He has a special love for some people like us, 'said NCP President Sharad Pawar to the Modi government.

Pawar was speaking at a press conference at the Yashwantrao Chavan Pratishthan in Mumbai on the background of the Agriculture Act brought by the Central Government and the opposition to it. He strongly criticized the central government this time. The Income Tax Department has sent me a notice regarding the affidavits for the 2009, 2014 and 2019 elections. There are some complaints about the affidavits of Chief Minister Uddhav Thackeray, Aditya Thackeray and Supriya Sule. I have also received notice after them. Supriya was supposed to be given yesterday, but I got it first. She is also expected to receive a notice. That's a good thing. I am happy that he has a special love for us, said Pawar. "I have been sent a notice as per the instructions of the Election Commission. Clarification has been sought in some cases. I will answer it soon. Pawar also said that if he did not answer, he would have to pay a fine of Rs 10,000 a day.

The growing number of corona patients in Maharashtra, the Sushant Singh Rajput suicide case, the controversy between Kangana Ranaut and the Shiv Sena were demanding the imposition of presidential rule in Maharashtra. Union Minister of State Ramdas Athavale, MP Navneet Rana and some others had demanded the same. Sharad Pawar, who made this demand, struck a chord. "Implementing presidential rule is not a joke and there is no need for it in Maharashtra," Pawar said.


©Mata