शीतपित्ताचा त्रास होत असताना...! Hives and diet

 




🧐 शीतपित्त आणि आहार


थंड पाणी किंवा थंड हवेशी संपर्क आल्यानंतर काही जणांच्या अंगावर पित्ताच्या गांधी उठतात. खाजेने त्रस्त करणाऱ्या गांधी येणाच्या या आजाराला शीतपित्त असे म्हटले जाते. अशा वेळी कोणता आहार घ्यावा जाणून घेऊ...


🤔 आहार कोणता घ्यावा? :

● शीतपित्ताचा त्रास होत असताना मुगाचे कढण, मसुराची डाळ अत्यंत गुणकारी ठरते. तुरीची डाळ, मटकीसारखी डाळसुद्धा उपयुक्त असून दोन्हींनी शीतपित्त वाढत नाही. दुधाच्या पदार्थानी शीतपित्त वाढण्याची शक्यता असते. 

● तुपाचे सेवन मात्र शीतपित्तामध्ये आरोग्यदायी ठरते. जायफळ व केशर हे पदरथ शीतपित्ताचा त्रास होणाऱ्या व्यक्तींनी आवर्जून आहारामध्ये घ्यावीत. 

● कांदा कापून त्यावर केवळ मिरपूड टाकून सेवन केल्यासही चांगला गुण येतो. आल्याचे आणि ओल्या हळदीचे लोणचे शीतपित्ताचा त्रास असणाऱ्यांनी नियमित जेवणासोबत खावे.



Hives and diet

Some people develop gallstones after contact with cold water or cold air. Gandhi's disease, which causes itching, is called cold sores. Let's find out what to eat at such a time ...

  What diet to follow? :

 Muga extract and lentil dal are very effective in treating colds. Pulses like turki dal and matki are also useful and both of them do not cause cold sores. Milk products are more likely to cause hives.

 Ghee consumption, however, is healthy in colds. Nutmeg and saffron should be taken in the diet of people suffering from colds.

 It is also good to cut the onion and add only black pepper to it. Ginger and wet turmeric pickles should be eaten with regular meals by those suffering from colds.