धोका वाढला! तज्ज्ञांकडून चिंता व्यक्त - Danger increased! Expressed concern by experts

 

गंगा नदीतल्या सजीवांसमोर मोठं संकट निर्माण झालं आहे. गंगा नदीतल्या डॉल्फिनच्या संरक्षणासाठी तैनात करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना दक्षिण अमेरिकेच्या ऍमेझॉन नदीत सापडणारा सकरमाऊथ कॅटफिश आढळून आला आहे. सातासमुद्रापार आढळून येणारा मासा गंगेत सापडण्याचा प्रकार दुसऱ्यांदा घडला आहे. सकरमाऊथ कॅटफिश आढळून येताच बीएचयूच्या जंतू विभागाच्या तज्ज्ञांनी त्यावर संशोधन केलं. यानंतर या माशाची ओळख पटली. [Danger increased! Expressed concern by experts]

बीएचयूचे प्राध्यापक बेचनलाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, ऍमेझॉन नदीत सापडणाऱ्या सकरमाऊथ कॅटफिशमुळे गंगा नदीतल्या माशांना मोठा धोका आहे. सकरमाऊथ कॅटफिश मांसाहारी असतो. त्यामुळे पाण्यातल्या इतर माशांना तो खातो. रामनगरच्या रमना गावाजवळ सकरमाऊथ कॅटफिश आढळून आला. बीएचयूच्या जंतू विभागाच्या तज्ज्ञांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या भागात आणखी सकरमाऊथ कॅटफिश आहेत का, याचा शोध सध्या घेतला जात आहे.

आधीच्या तुलनेत माशांच्या प्रमाणात घट

तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगा नदीतल्या माशांची संख्या जवळपास २० ते २५ टक्क्यांनी कमी झालेली आहे. यामागे परदेशी मासे असल्याचं तज्ज्ञ सांगतात. याआधीही गंगा नदीमध्ये कॅटफिश आढळून आले होते. यानंतर आता सकरमाऊथ कॅटफिश सापडल्यानं चिंता वाढली आहे.


Danger increased! Expressed concern by experts

There is a big crisis in front of the living beings in the river Ganga. Staff deployed to protect dolphins in the Ganges have found a suckermouth catfish found in the Amazon River in South America. This is the second time that a fish found across the ocean has been found in the Ganges. As soon as the suckermouth catfish was discovered, experts from BHU's germs department conducted research on it. This fish was later identified.

According to BHU Professor Bechanlal, suckermouth catfish found in the Amazon River pose a major threat to fish in the Ganges. Suckermouth catfish are carnivores. So he eats other fish in the water. Suckermouth catfish was found near Ramna village in Ramnagar. Experts from BHU's germs department went to the spot and inspected it. Whether there are more suckermouth catfish in the area is currently being investigated.

Decreased amount of fish compared to before

According to experts, the number of fish in the river Ganga has decreased by about 20 to 25 per cent. Experts say that this is due to foreign fish. Catfish had earlier been found in the river Ganga. After this, the discovery of Suckermouth catfish has raised concerns.