Crime News Today प्रेयसीची गळा कापून हत्या, आरोपीनं गाठलं पोलीस स्टेशन



 शेतात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या महिलेचा मृतदेह आणि दुसरीकडे रक्तानं माखलेला सुरा घेऊन आरोपी थेट पोलीस ठाण्यात आल्यानं मोठी खळबळ उडाली. आरोपीला पोलिसांनी तातडीनं ताब्यात घेतलं असून संपूर्ण प्रकाराची चौकशी केली आहे.

सौरभ असं या 22 वर्षीय आरोपीचं नाव आहे. एका कपड्याच्या दुकानात हा काम करायचा. संजीदा-हसीन दाम्पत्य त्याचे शेजारी होते. या दोघांनाही चार मुलं आहेत. दीड वर्षांपूर्वी हसीन आणि सौरभमध्ये अवैध संबंध प्रस्थापित झाले त्यानंतर दोघंही एकमेकांना चोरून भेटायला लागले.

काही दिवसांपूर्वी सौरभ आणि हसीन शेतात भेटत असल्याचं ग्रामस्थांनी पाहिलं आणि गावात चर्चा सुरू झाली. या प्रकरणामुळे हसीनला पतीनं घराबाहेर पडणंही बंद केलं. मात्र तरीही हसीन लपून छपून घराबाहेर पडत राहिली. सौरभने भेटण्यासाठी नकार दिल्यानंतर त्याला ब्लॅकमेल करायला लागली. सततच्या ब्लॅकमेलिंगला वैतागून अखेर सौरभनं हसीनचा काटा काढण्याचा निर्णय घेतला.

सौरभ आणि हसीनचं शेतात भेटायचं ठरलं. ठरलेल्या वेळेत सौरभ पोहोचला पण आज नुसताच नाही तर धारदार चाकू घेऊन. त्यानं हसीनच्या गळ्यावरून फिरवला आणि रक्ताच्या थारोळ्यात ती कोसळली. सौरभ तसाच रक्तानं माखलेला चाकू घेऊन थेट पोलीस ठाण्यात पोहोचला आणि घडलेला प्रकार सांगितला.

या प्रकरणी पोलिसांनी आरोपी सौरभला ताब्यात घेतलं असून घटनास्थळी जाऊन पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.


English News

Accused reached the police station after killing his girlfriend by cutting her throat


The accused came straight to the police station with the body of a woman lying in a pool of blood in the field and a blood-stained knife on the other side. The accused has been immediately arrested by the police and a thorough investigation is underway.

The 22-year-old accused is identified as Saurabh. I used to do this work in a clothing store. The Sanjida-Haseen couple were his neighbors. They both have four children. After an illicit affair between Haseen and Saurabh a year and a half ago, the two started dating secretly.

A few days ago, the villagers saw Saurabh and Haseen meeting in the field and a discussion started in the village. Due to this case, her husband stopped her from leaving the house. However, Hussein kept hiding and falling out of the house. After Saurabh refused to meet him, he started blackmailing him. Annoyed by the constant blackmailing, Saurabh finally decided to remove Hasin's thorn.

Saurabh and Haseen decided to meet in the field. Saurabh arrived on time but not just today but with a sharp knife. He twisted it around Hussein's neck and she collapsed in a pool of blood. Saurabh rushed to the police station with a blood-stained knife and told what had happened.

In this case, the police have arrested the accused Saurabh and after going to the spot, the police have taken the body into custody and sent it for autopsy.