🤓 ...म्हणून डोळे नेहमीच सुजलेले दिसतात!


अनेकांचे डोळे कायम सुजल्या सारखे वाटतात. याची नेमकी कारणं आणि घरगुती उपाय आपण जाणून घेणार आहोत... 


1) शांत आणि पूर्ण झोप घेणे गरजेचे असते. मात्र जर तुमची पुरेशी झोप झाली नसेल तरीही तुम्हाला ही समस्या येऊ शकते. यासाठी चांगली झोप घ्या.


2) जर शरीरात पाण्याची कमतरता असेल तरीही डोळ्यांखाली सूज येते. यासाठी सकाळी उठल्यानंतर तसेच रात्री झोपण्यापूर्वी देखील पाण्याचे सेवन फायदेशीर ठरते.


3) तुम्ही जर मिठाचे अतिसेवन करत असाल तर डोळ्यांखाली सूज किंवा काळी वर्तुळं येतात. यासाठी मिठाचं सेवन प्रमाणात हवे. 


4) सतत एकाच कुशीवर/ पोटावर झोपत असाल तर प्रयत्न करा की, झोपताना तुमचं डोकं शरीरापेक्षा थोडं वर उचललेलं असेल. 


Disclaimer : आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जबाबदारी ILOVEBEED घेत नाही.