💥 'Honor' कंपनीचा पहिला लॅपटॉप लाँच


💫 'Honor' कंपनीचा पहिला लॅपटॉप 'MagicBook 15' हा AMD Ryzen 3000 सीरिज सीपीयूसोबत भारतात लाँच झाला आहे.


💁‍♂️ खास वैशिष्ट्ये : 


▪️ Honor MagicBook 15 मध्ये विंडोज १० प्री-इंस्टॉल्ड मिळणार असून १५.६ इंचचा फुल एचडी+आईपीस डिस्प्ले दिला आहे. 


▪️ लॅपटॉपची स्क्रिन रेजोल्यूशन 1,920×1,080 पिक्सल असून १७८ डिग्री व्यूइंग अँगल आणि ८७ टक्के स्क्रिन टू बॉडी रेश्यो आहे. 


▪️ हा डिव्हाइस AMD Ryzen 5 3500U प्रोसेसरवर काम करत आहे, तसेच Radeon Vega 8 ग्राफिक्सचा उपयोग केला गेला आहे.


▪️ डिव्हाइसमध्ये 8GB DDR4 dual-channel रॅम दिला असून यामध्ये 256GB PCIe NVMe SSD आहे. 


▪️ यामध्ये 65W चार्जर दिला आहे आणि टाईप सी पोर्टच्या मदतीने लॅपटॉप चार्ज केला जाऊ शकतो. 


▪️ कनेक्टिविटीसाठी वाय-फाय, ब्लूटूथ, एनएपसी, यूएसबी २.०, यूएसबी ३.०, एचडीएमआई पोर्ट, यूएसबी टाइप सी पोर्ट यांसह अनेक फीचर्स दिलेले आहेत.


📌 या लॅपटॉपची भारतीय बाजारातील किंमत ४२ हजार ९९० रुपये  इतकी असून  युजर्स हा लॅपटॉप Flipkart च्या माध्यमातून खरेदी करू शकतात.