🌽 🌽 मक्याचे कणीस खाण्याचे आरोग्यदायी फायदे!


मक्याचे कणीस खाल्याने आपल्या शरीराला अनेक आरोग्यदायी फायदे होतात. आज ते पाहुयात.. 


1. मक्यामधील आयर्न, मॅग्नेशियम ही तत्वे हाडांना मजबूत करतात. 


2.: मक्यात व्हिटॉमिन ए आणि बीटा कॅरेटीन असते. यामुळे दृष्टी सुधारण्यास मदत होते.


3. मक्यात कार्बोहायड्रेट भरपूर प्रमाणात असल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते. 


4. मक्याचे कणीस उकडून त्यात हळद आणि मीठ घालून खाल्ल्यास वात किंवा पित्ताच्या विकारापासून आराम मिळतो.


5. मक्यात असलेल्या बायोफ्लेवोनॉयड्स, कॅरोटेनॉयइस, विटॉमिन्स आणि फायबरमुळे शरीरातील अतिरिक्त फॅट्स कमी होतात. ज्यामुळे कोलेस्ट्रॉल कमी होते.


6. मक्याचे कणीस खाल्ल्याने शरीरातील हिमोग्लोबिन तसेच रक्ताची कमतरता दूर होते. 


Disclaimer : आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जबाबदारी ILOVEBEED घेत नाही.