💻 गुगलचे हे लोकप्रिय 'अ‍ॅप' होणार बंद


💫 गुगल लवकरच आपले हे म्यूझिक अ‍ॅप बंद करणार आहे. गुगलने या संदर्भात माहिती आपल्या ब्लॉगमध्ये दिली आहे.


✨ गुगल प्ले म्यूझिक अ‍ॅपच्या सर्व युजर्सला यानंतर युट्यूब म्यूझिकवर शिफ्ट केले जाईल. मागील काही महिन्यांपासून गुगल युट्यूब म्यूझिक अ‍ॅपसाठी नवनवीन फीचर जारी करत आहे.


🔊 युट्यूब म्यूझिक अ‍ॅपवर शिफ्ट झाल्यानंतर युजर्सला गुगल प्ले म्यूझिक अ‍ॅपची प्लेलिस्ट, लायब्रेरी आणि म्यूझिक मिळेल. गुगल प्ले- म्यूझिकला ऑक्टोंबर 2020 नंतर कोणतेही अपडेट मिळणार नाही. तर डिसेंबर 2020 पर्यंत युजर्सला युट्यूब म्यूझिक अ‍ॅपवर शिफ्ट करण्याची प्रक्रिया पुर्ण होईल.


📌 सप्टेंबर महिन्यापासून दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडचे युजर्स या अ‍ॅपचा वापर करू शकणार नाहीत. तर ऑक्टोंबरपासून जगभरात हे अ‍ॅप बंद होईल. गुगल युट्यूब म्यूझिकवर नवनवीन फीचर देऊन युजर्सला आकर्षित करत आहे.