🎯 गुगलचा मोठा निर्णय! Google's big decision!


⚡ गुगलने आपल्या कर्मचार्‍यांचा घरून काम करण्याचा (Work From Home) अवधी पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत वाढवला आहे. 


📝 कंपनीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गुगलचे कर्मचारी जुलै 2021 पर्यंत घरातून काम करू शकतात.


📧 यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी कर्मचार्‍यांना ईमेल पाठविला आहे. 


✍️ ई-मेलमध्ये लिहिले आहे : 'कर्मचार्‍यांना पुढील नियोजन करण्यासाठी आम्ही घरातून काम करण्याचा पर्याय जुलै 2021 पर्यंत वाढवत आहोत. हे अशा कर्मचाऱ्यांसाठी असेल ज्यांना कार्यालयातून काम करण्याची आवश्यकता नाही.' 


👍 वृत्तानुसार सुंदर पिचाई यांनी काही महत्त्वाच्या गुगलच्या अधिकाऱ्यांशी सल्लामसलत केल्यानंतर स्वत: हा निर्णय घेतला आहे.