👩 डोक्यातील कोंडा साफ करण्यासाठी प्रभावी उपचार!


अनेकांची केसांमध्ये असणाऱ्या कोंड्याची समस्या सहजा-सहजी जात आहे. म्हणूनच आपल्या डोक्यातील कोंड्याची समस्या कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय आम्ही घेऊन आलो आहोत. 


1. दुधी भोपळा :  याचा रस बनवून तो केस आणि डोक्यावर अर्धा तास राहू द्या. नंतर, पाण्याने पूर्णपणे स्वच्छ करा.


2. बेकिंग सोडा : यामध्ये 3-4 चमचे थोडेसे पाणी घाला. शॅम्पूनंतर ते आपल्या केसांवर आणि डोक्यावर लावा. 5-10 मिनिटे ते केसांवर तसेच ठेवा. मग, पाण्याने स्वच्छ करा. 


3. नारळ तेल आणि लसूण : 6 चमचे लसूण तेल, 2 चमचे नारळ तेल आणि एक चमचे मेंहदी तेल असणारे मिश्रण तयार करून बाटलीमध्ये भरा. शॅम्पू करण्यापूर्वी या तेलाने आपल्या डोक्याची मालिश करा. तासभर असेच ठेवा. मग, सोप्या पद्धतीने शॅम्पू करा.


4. मध : शॅम्पू किंवा कंडिशनरमध्ये एक लसूण कळी आणि मध मिसळा आणि केसांवर लावा. यामूळे डोक्यावर साचलेली घाण आणि प्रदूषण करणारे कण साफ होतील. 


Disclaimer : आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जबाबदारी ILOVEBEED घेत नाही.