🚗 पावसात कार चालविताय? 'या' गोष्टी तपासून घ्या!


पावसाळ्यात कार चालविणे फार जिकरीचे आणि जोखिमेचे काम आहे. त्यामुळे पावसात कारमधून जाण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टींची खात्री करून घेणे फार गरजेचे आहे. अन्यथा कारमध्ये तांत्रिक समस्या निर्माण होऊ शकतात. 


💁‍♂️ खालील गोष्टी तपासून घ्या :


1. प्रथम टायरमधील हवा आणि ते योग्य स्थितीत आहे का?


2. आपल्या कारची बॅटरी योग्य स्थितीत काम करते आहे की नाही?


3. कारचे वायपर व्यवस्थितरित्या काम करत आहे का? 


4. गाडीचा ब्रेक चांगल्या स्थितीत आहे की नाही? तसेच ब्रेक पेड्स नीट स्वच्छ करून घ्या.


5. कारच्या सर्व हेडलाइट्स चालू आहे की नाही? 


6. तुमच्या गाडीतील एसीचे नीट कुलिंग होते की नाही? 


वरील गोष्टींची वेळीच तपासणी केली तर प्रवासात तुम्हाला कुठलीही अडचण येणार नाही.