🤓 तुम्ही गरम पाण्याने केस धुता? मग वाचा!


आपण सर्वच बहुदा गरम पाण्याने अंघोळ करायला प्राधान्य देतो. मात्र केसांसाठीही आपण गरमच पाणी वापरत असू तर त्याचे अनेक तोटे आहेत. त्याबाबत माहिती पाहुयात... 


1) केसांची मुळं कमोजर होतात. तसेच जास्त गरम पाण्याने अंघोळ केली तर केसगळतीची समस्या होऊ शकते.


2) केरोटीन प्रोटीनने केस तयार झालेले असतात. अशात ते गरम पाण्याच्या संपर्कात येताच केस गळण्याचा धोका निर्माण होतो.


3) तुम्ही गरम पाणी आणि त्यातही शॅम्पू करत असाल तर केसगळती जास्त होते. त्यामुळे असे करणे टाळा. 


4) केसांना कंडीशनर लावल्यानंतर जर तुम्ही गरम पाण्याने केस धुतले तर त्याचा प्रभाव नष्ट होतो. अशा वेळीही केसांसाठी गरम पाण्याचा वापर टाळावा.


5) गरम पाण्याने अंघोळ केल्यानंतर केसांचे, त्वचेचे आणि डोक्याचेही नुकसान होतं. त्वचेवर लाल चट्टे आणि जळजळ देखील होऊ शकते.


Disclaimer : आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जबाबदारी ILOVEBEED घेत नाही.