बलात्कारानंतर गर्भवती पीडितेचा विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न [Beed News]



 बीड बातम्या [Beed News] : बलात्कारानंतर पीडित गर्भवती महिलेने विषारी द्रव प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. ही खळबळजनक घटना तालुक्यातील सोनेगाव येथे शनिवार (दि.29) उघडकीस आली. पीडितेवर उपचार सुरु असून आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.पोलिसांच्या माहितीनुसार, सोनेगाव [Beed News] येथील २० वर्षीय महिला दोन महिन्यांची गरोदर आहे. तिचा पती कामानिमित्त बाहेरगावी असतो. सासू-सासऱ्यांसमवेत ती राहते.


 शिवदास सुभाष चौरे (२४, रा. सोनेगाव) याने ही संधी साधत २५ एप्रिल ते २७ ऑगस्ट दरम्यान बळजबरीने तिच्यावर अत्याचार केला. शिवदास चौरे याच्या अत्याचाराला ती पुरती वैतागली होती. बदनामीच्या भीतीने अखेर तिने २७ ऑगस्ट रोजी घरी विषारी द्रव प्राशन केले. त्यानंतर कुटुंबियांनी तिला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, पोलिसांनी घेतलेल्या जवाबात तिने अत्याचाराला कंटाळून विष घेतल्याची धक्कादायक माहिती दिली. [Beed News]


या जवाबावरुन शनिवारी पाटोदा ठाण्यात शिवदास चौरेवर बलात्काराचा गुन्हा नोंदविण्यात आला. उपनिरीक्षक फिरोज पठाण यांनी सोनेगाव येथून रविवारी शिवदास चौरे याच्या मुसक्या आवळल्या.[Beed News] त्यास सोमवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. दरम्यान, पीडितेवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असून तिची मृत्यूशी झुंज सुरु आहे.