👌 तुमच्यासाठी उपयुक्त टिप्स


● डोकेदुखी : सफरचंद सोलून त्याच्या बारीक तुकड्यांना थोडे मीठ लावून सकाळच्या वेळी रिकाम्या पोटी खा. डोकेदुखी बरी होईल.

● तोंड दुर्गंधी : दालचिनीचा छोटासा तुकडा तोंडात ठेवल्याने तोंडाची दुर्गंधी दूर होईल.

● सर्दी : तुमचे नाक वाहात असेल तर युकेलिप्टसचे तेल रुमालावर शिंपडून त्याने श्वास घ्या.

● केसगळती : चहाच्या उकळवलेल्या पाण्याने केस धुतल्यास केसगळती थांबू शकते.

● निद्रानाश : वांग्याच्या भरीतामध्ये थोडे मध मिसळून खाल्ल्यास निद्रानाश दूर होतो. रात्रीच्या जेवणात मध लावलेल्या वांग्याचे भरीत खायचे.

● अतिसार : संत्र्याच्या रसात थोडे मध मिसळून तो रस दिवसातून तीनवेळा प्यायल्यास गर्भवतींची अतिसाराची तक्रार दूर होईल.

● घसा खवखव : सकाळच्या वेळी बडीशोप चावून खाल्ल्यास बंद गळा मोकळा होईल.