🦷 'या' उपायामुळे दात किडण्याची समस्या होईल दूर!


हल्ली लहानांसह मोठ्यांमध्ये दात दुखणे तसेच दात किडण्याची समस्या जास्त दिसून येते आहे. यावर पेनकिलर हा उपाय नसून नियमितपणे काळजी घेणे हा उपाय आहे. त्यावर एक नजर...

1. हळद : हळद बोटांवर घेऊन दातांना घासल्याने हिरड्या मजबूत होतील. त्यातून रक्त येणार नाही. रोगप्रतिकारकशक्ती वाढते.

2. पेरूची पाने : पेरूची पाने पाण्यात उकळून त्या कोमट पाण्याने गुळण्या करा. यामुळे दातांना बळकटी मिळेल.

3. लिंबाची पाने : लिंबाच्या पाल्यात अँटी-माइक्रोबियल गुण असल्याने त्याने दात घासा. याने बराच फायदा होईल.

4. लवंग : लवंगाच्या तेलाचा वापर केला तर दात किडणार नाहीत.

5. मीठ : मीठाच्या पाण्याने गुळण्या केल्याने सुध्दा दात निरोगी राहतात.

🤓 हे लक्षात ठेवा : साखरयुक्त चिकट पदार्थ खाल्याने अनेकदा ते दातांना, दाढांना चिकटून राहतात. यामुळे दाढ किडायला सुरूवात होते. यासाठी असे काही खाल्यानंतर गुळण्या करा, ब्रश करा.

Disclaimer : आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी ILOVEBEED घेत नाही.