🔒 लॉकडाऊनदरम्यान अशी घ्या मानसिक आरोग्याची काळजी


🦠 कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देश lockdown आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी सगळ्यांना घरात राहावं लागत आहे.

👉 परंतु lockdown मुळे घरात असणाऱ्या बऱ्याच लोकांमध्ये मानसिक आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहेत. इतकंच नाही तर World Economic Forum lockdown हा जगातील सर्वात मोठा मानसशास्त्रीय प्रयोग असल्याचं म्हटलं आहे.

💪 शारीरिक तंदुरुस्ती

सध्याच्या परिस्थितीत मैदानी खेळ खेळणे कठीण आहे. त्यामुळे तुम्ही घरातच राहून शारीरिक व्यायामाचा शोध घ्यावा किंवा निवड करावी. दररोज एक तास नृत्य, योग किंवा Treadmill वापरावे.

👍 स्वत:ला प्रोत्साहित करा

आपला आत्मविश्वास आणि इच्छाशक्ती चांगली ठेवावी यासाठी लोकांनी स्वत:ला प्रोत्साहन दिलं पाहिजे.

👉 चिंता आणि पॅनीक हल्ल्यांचा सामना करणे

Covid च्या संबंधात चिंता आणि Panic अटॅकविषयी चर्चा करतात. चिंता दूर करण्यासाठी, श्रवणीय संगीत ऐकणे, मित्र आणि कुटुंबियांकडे भावना व्यक्त करणे आणि पॅनिक अटॅकचा सामना करण्यासाठी परिस्थितीतून लक्ष अन्यत्र वळवणे यासारख्या टिप्स वापराव्यात.

💁 गृहिणींनी कुटुंबासोबत वेळ घालवावा

कामे पूर्ण करण्यात सहभागी होण्यासाठी तिने लहान मुलांपासून कुटुंबातील वडीलधाऱ्यांपर्यंत प्रत्येकाच्या सहभागास प्रोत्साहन दिले पाहिजे. गृहिणींनी केवळ कामात बुडून न जाता कुटुंबासमवेत वेळ घालवला पाहिजे, छंद जोपासतानाच स्वतःची काळजी घ्यावी.

👌 शारीरिक स्वच्छता ठेवा

व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी मास्क घालण्याची, हात धुण्यासाठी आणि सामाजिक अंतराचे पालन करावे. नियमांचे काटेकोरपणे पालन केल्यावरच आपण स्वतःचे आणि आपल्या प्रियजनांचे संरक्षण करु शकतो.