🤓 शरीर पाण्याची कमतरता असल्याचे संकेत ओळखा!


घाम व तहान या व्यतिरिक्त आपले शरीर पाण्याची कमतरता असल्याचे अनेक संकेत देत असतात. अनेकदा आपल्याला ते कळत नाही. आज आपण या संकेतांबद्दल जाणून घेऊयात...

1. डोकेदुखी : पाणी कमी झाल्याने शरीराचे तापमान खाली येते. अशात मेंदूपर्यंत ऑक्सिजनबरोबरच रक्त पुरवठा होत नाही. यामुळे डोकं दुखायला लागते. असे तज्ज्ञ सांगतात.

2. लक्ष लागत नाही : शरीरात पाण्याची कमतरता निर्माण झाल्यानंतर त्याचा परिणाम मेंदूवर होतोच. यामुळे स्मरमणशक्ती क्षीण होते, निर्णय घेण्यात अडचणी येतात, कामात लक्ष लागत नाही.

3. पचनशक्तीवरही परिणाम : अन्नाचे पचन होण्यात पाण्याची मोठी भूमिका असते. अन्यथा अन्नाचे पचन नीट झाले नाही तर बद्धकोष्ठता, पित्त यासारखी समस्या उद्धवते. यामुळे जेवण झाल्यावर पुरेसे पाणी पिणे गरजेचे आहे.