🤓 'हे' पदार्थ औषधांसोबत कधीच खाऊ नका!


अनेकदा औषधांचं सेवन करताना आपण त्यासोबत असे काही पदार्थ खातो/ पितो कि, ज्याने एकतर औषधांचा परिणाम कमी होतो किंवा ते शरीरासाठी हानिकारक असते. याबद्दल आज जाणून घेऊयात...

1) चहा, कॉफी किंवा कोणत्याही गरम पेयासोबत औषधांचे सेवन करून नका. अशाने औषधाचा योग्य तो फायदा मिळत नाही.

2) जर तुम्ही औषध घेत असाल तर लिंबू, संत्री, द्राक्षं, लोणचं, चिंच असे पदार्थ खाणे टाळा. कारण याने शरीरात अनेक वेगवेगळ्या समस्या निर्माण होऊ शकतात.

3) ब्लड प्रेशरची औषधं घेणाऱ्यांनी केळी / जास्त पोटॅशियम असणारी फळं खाऊ नयेत. याने हृदयाचे ठोके वाढू शकतात.

4) डेअरी प्रॉडक्ट्स शरीरातील अँटीबायोटीक औषधांचा प्रभाव शून्य करू शकतात. त्यामुळे हे सोबत घेणे टाळा.

5) अल्कोहोलसोबत औषधाचं कधीच सेवन करू नये. कारण यामुळे औषधांमधील केमिकल्सची आणि अल्कोहोलची रिअ‍ॅक्शन होते.

6) सोडा/ कोल्डड्रींक्ससोबत औषधं घेण्याची चूक तर कधीच करू नका.

Disclaimer : आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जबाबदारी ILOVEBEED घेत नाही.