🎯 घरीच बनवा आयुर्वेदिक काढा!


कोरोनाच्या पर्शभूमीवर आपली प्रतिकारशक्ती मजबूत असणे आवश्यक असल्याचे लोकांच्या लक्षात आले आहे. म्हणून आपल्यासाठी खास आयुर्वेदिक काढ्याची माहिती घेऊन आलो आहोत... 

💁‍♂️ साहित्य (1 कप काढा) :2 ते 3 वेलदोडा (हिरवा किंवा काळा), एक बुटुक कच्ची हळद, 8 ते 10 लवंग, 8 ते 10 काळे मिरे, दालचिनी, 1 छोटं बुटुक आलं (अद्रक), गवती चहा, 10 ते 12 तुळस पानं, गूळ किंवा मध.

🤓 काढा असा बनवा : 

● प्रथम हळद आणि आले चांगले कुटून घ्या.
● त्यानंतर उकळलेल्या पाण्यात वेलदोडा (हिरवा किंवा काळा), कच्ची हळद, लवंग, काळे मिरे, दालचिनी, आलं (अद्रक), मनुके आणि तुळस असे सर्व मसाले टाका.
● हे मिश्रण किमान  20 ते 30 मिनिटे चांगले उकळू द्या.
● जवळपास अर्ध्या तासानंतर काढ्याचा रंग विटकरी झाला की, यात गूळ किंवा मध टाका.

💫 हा काढा आजारी असलेले, नसलेले सर्व व्यक्ती सेवन करू शकतात. यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढते.

Disclaimer : आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जबाबदारी ILOVEEBEED घेत नाही.