👌 आरोग्यासाठी लवंग खाण्याचे फायदे जाणून घ्या!


 आपल्याकडे लवंगचा वापर प्रामुख्याने मसाला म्हणून वापरण्यात येतो. पण त्याचे काही फायदेशीर गुणधर्म सुद्धा आहेत. त्यावर एक नजर... 

1. दाताच्या दुखवण्यावर होणाऱ्या तीव्र वेदनांना कमी करण्यात लवंग फायदेशीर ठरते.

2. तुमच्या मुखातून दुर्गंध येत असेल तर लवंग यासाठी सर्वोत्तम उपाय आहे. तसेच याने तुम्हाला फ्रेशही वाटेल.

3. मळमळ किंवा उलटी थांबविण्यासाठी सुद्धा लवंग उत्तम पर्याय आहे.

4. लवंग हा पोटदुखीवर तसेच पचनक्रिया सुस्थितीत आणण्यास फायदेशीर ठरते.

5. डोकेदुखी, टाचांमध्ये उत्पन्न होणाऱ्या वेदनांना कमी करण्यास, तसेच शरीराची प्रतिरोधक क्षमता वाढवण्याचे काम लवंग करते.

6. मायग्रेन, सर्दी, कानातील इन्फेकशनसाठी लवंगच्या तेलाचा वापर करू शकता.

7. लवंगात अँटी ऑक्‍सीडेंटमुळे त्वचा उजळते आणि रोगप्रतिकारकशक्ती वाढीस लागते.

Disclaimer : आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी ILOVEBEED घेत नाही.