🤓 पाणी कसे प्यावे? नक्की वाचा!


निरोगी आरोग्यासाठी नियमित आणि पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे. मात्र कितीही पाणी पिणे चांगले नाही. योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात पाणी प्यायल्यावरच अनेक गंभीर आजारांपासून वाचता येते. म्हणून पाणी कसे प्यावे याबाबत माहिती पाहुयात...!

● जेवणाच्या अर्धा तास आधी एक ग्लास पाणी प्या. यामुळे अन्न चांगले पचते.

● काही लोक जेवण झाल्यावर घटाघट पाणी पितात. हे चुकीचे आणि आरोग्यासाठीही धोकादायक आहे.

● आंघोळीला जाण्यापूर्वी एक ग्लास पाणी पिण्याची सवय ठेवा. त्यामुळे रक्तदाब कमी व्हायला मदत होते.

● रात्री झोपायला जाण्याआधी एक ग्लास पाणी पिण्याचीही सवय जडवून घ्या.

● तोंडात जी लाळ तयार होते ती पोटातील अन्न पचवण्यासाठी आम्ल तयार करण्यासाठी फायद्याची ठरते. त्यासाठी हळुवार पाणी प्या .

● दररोज सकाळी रिकाम्या पोटी 1 ग्लास गरम पाण्यात 2 मोठे चमचे मध आणि त्यात अर्धा चमचा लिंबाचा रस घालून प्या.

● पाणी कधीही बसूनच प्या  त्यामुळे निर्माण होणारे क्षार पोटात अन्नाचे चांगले पचन करतात.

Disclaimer : आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी ILOVEBEED घेत नाही.