☺️ एक अटीसह यूट्यूबवर HD क्वालिटीचे व्हिडिओ पाहता येणार


🎯 माहितीनुसार, यूट्यूबने हाय डेफिनेशन (HD) व्हिडिओ स्ट्रीमिंग आपल्या मोबाईल ॲपवर पुन्हा सुरू केले आहे.

👉 लॉकडाऊन दरम्यान कंपनीने भारतात इंटरनेटचा कमीत कमी वापर व्हावा यामुळे HD स्ट्रीमिंगवर निर्बंध लादले होते.

💁‍♂️ आता हे निर्बंध युट्यूबवरून काढले गेले आहेत. त्यामुळे युजर्सना यूट्यूब मोबाईल ॲपवर एचडी आणि फुल एचडी व्हिडिओ पाहता येतील.

🤓 कंपनीने ठेवली एक अट :  

● यानुसार, केवळ यूट्यूबचे एचडी आणि फुल एचडी व्हिडिओ वाय-फाय कनेक्शनसह पाहता येतील.
● तसेच मोबाईल डाटा ब्राउझिंगवर सध्या SD कॉलिटी चे व्हिडिओ पाहता येतील.
● पण वाय-फाय इंटरनेट कनेक्शन असल्यावर तुम्हाला युट्युबवर 720p,1080p आणि 1440p या कॉलिटीचे व्हिडिओ पाहता येतील.
● त्याचबरोबर मोबाईल इंटरनेट नेटवर्कवर युजर्स 144p,240p,360p आणि 480p या क्वालिटी चे व्हिडीओ पाहू शकतात.
● जर तुम्ही वायफाय कनेक्शनवर HD व्हिडिओ पहात असाल तर तुमची व्हिडीओ कॉलिटी 480p होऊन जाईल.