🤓 जाणून घ्या पोट फुगण्याची प्रमुख कारणं! Find out the main causes of bloating!



अनेकांना सातत्याने पोट फुगण्याची समस्या उद्भवत असते. याला कारण तुमचा आहार, स्ट्रेस आणि बसण्याची पद्धतही असते. याबाबत सविस्तर माहिती पाहुयात...

1) आपण जे काही जंक फूड खातो त्यात बरंच मीठ असतं. तज्ज्ञ सांगतात की, शरीरातील या अतिरीक्त मिठाच्या पाण्यामुळे पोट फुगू शकते.

2) तणावात असणारे लोक प्रमाणापेक्षा जास्त हवा हवा पोटात घेतात. ती हवा पोटात जमा झाल्याने पोट फुगते.

3) अनेकदा आतड्याच्या मांसपेशी टाईट होतात आणि तुमचा डायफग्राम छातीजवळ येतो. यामुळे गॅससाठी जागा तयार होते.

4) जर तुम्ही फक्त प्रोटीनयुक्त डाएट घेत असाल तर यामुळं मायक्रोबिअल विकासावर प्रभाव पडतो आणि पोट फुगते.

5) जेवल्यानंतर लगेच झोपत असाल तर पोटात गॅस तसाच राहतो आणि पोट फुगते.

6) जेव्हा तुम्ही सरळ बसता तेव्हा पोटावर प्रेशर येतो आणि गॅस बाहेर पडतो. पंरतु जेवणानंतर लगेचच झोपल्याने गॅस तसाच पोटात राहून पोट फुगते.

Disclaimer : आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जबाबदारी ILOVEBEED घेत नाही.