👉 तुमच्या हातातला Duplicate Sanitizer तर नाही ना? घरच्या घरी घ्या टेस्ट


🦠 कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी सध्या तरी कोणतंच औषध आलेलं नाही. त्यामुळे केवळ सोशल डिस्टन्सिंग हाच एक पर्याय आहे.

⚡ याशिवाय हात सतत स्वच्छ धुणे आणि Sanitizer चा वापर करण्यास सांगितलं जात आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढल्यापासून सॅनिटायझर रोजच्या वापरातली गोष्ट बनली आहे.

👉 मात्र यातही बनावट सॅनिटायझर बाजारात आल्यानं मोठी अडचण निर्माण झाली आहे. ओरिजनल आणि Duplicate Sanitizer मधील फरक ओळखणं कठीण होत आहे.

⚡ मात्र हे कसं ओळखायचं यासाठी काही गोष्टी तुम्हाला माहिती असायला हव्यात.

👉 Duplicate Sanitizer ओळखण्यासाठी तुम्ही टॉयलेट पेपर किंवा टिश्यू पेपरचा वापर करू शकता. यासाठी पेपरवर पेनच्या मदतीने एक गोल तयार करा.

👉 पेपरच्या बरोबर सेंटरला हा गोल तयार करा. पेनने तयार केलेल्या गोलामध्ये सॅनिटायझरचे काही थेंब टाका. जर या पेनाची शाई पसरली तर समजून जा की सॅनिटायझर बनावट आहे.

⚡ तो तुमच्या हाताला पुर्णपणे निर्जंतुक करण्यास सक्षम नाही. जर शाई पसरली नाही आणि Sanitizer टाकल्याने भिजलेला पेपर लगेच वाळला तर तो सॅनिटायझर वापरण्यायोग्य आहे असे समजावे.