🤓 पावसात भिजल्यावर 'या' गोष्टी कराच!


पावसाळा सुरू झाल्यामुळे अनावधानाने का होईना आपण भिजतोच. अशात आपल्याला अधिकच खबरदारी घेण्याची गरज आहे. असे केले नाही तर आजारी पडण्याची शक्यता जास्त असते.

1. कपडे बदला : पावसात भिजले असाल तर सर्वात आधी कपडे बदला. अन्यथा यामुळे थंडी लागून आजारी पडण्याची शक्यता निर्माण होते.

2. केस वाळवून घ्या : कोमट पाण्याने अंघोळ करा. नंतर आपल्या संपूर्ण शरीराला विशेषतः आपल्या केसांना वाळवून घ्या. कारण केस ओले झाल्यामुळे डोक्यात संसर्गाचा धोका वाढू शकतो.

3. खाण्यापिण्याची काळजी : पावसाळ्यात सर्वत्र पाणीच पाणी असल्यामुळे व्हायरल आणि बेक्टेरियल संसर्गाचा धोका वाढतो. अशात  खाण्यापिण्याची विशेष काळजी घेतली पाहिजे.

4. तेलकट, फास्ट फूड टाळा : पावसाळ्यात बाहेरचे खाद्यपदार्थांचे सेवन केल्याने आपले पोट खराब होऊ शकत. त्यातच जर तुम्ही भिजला असाल तर असे पदार्थ खाणे टाळाच.

5. व्यायाम कराच : हलके-फुलके व्यायाम करा. याने आपण तंदुरुस्त राहाल. तसेच बाहेरून भिजून आल्यावर ताणण्याचे व्यायाम केल्यास शरीरामध्ये पटकन उब येईल.